Coronavirus: घरातील सदस्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर काय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 10:51 AM2020-03-24T10:51:53+5:302020-03-24T10:59:13+5:30

coronavirus : अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, अशी कोणती लक्षणे आहेत जेव्हा तुम्हाला मेडिकल केअरची गरज आहे.

Coronavirus : What to do if you loved one show symptoms test positive covid 19 api | Coronavirus: घरातील सदस्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर काय करावे?

Coronavirus: घरातील सदस्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर काय करावे?

Next

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे जगभरातील लोक गोंधळलेले आहेत.  कारण आतापर्यंत हजारो लोकांचा जीव या व्हायसरने घेतला आहे. तर लाखो लोकांना व्हायरसची लागण झालेली आहे. हा व्हायरस पसरत असताना आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक कशाना कशाप्रकारे प्रभावित होतील. काही लोक कोरोना व्हायरसने केवळ माइल्ड किंवा मॉडरेट लेव्हलवर प्रभावित होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडणार नाही.

अशात अजूनही अनेक लोकांच्या मनात या कोरोना व्हायरसच्या लागण होण्याबाबत अनेक प्रश्न आहेत. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, अशी कोणती लक्षणे आहेत जेव्हा तुम्हाला मेडिकल केअरची गरज आहे. न्यूयॉर्क टाइम्सने याबाबत काही गाइडलाईन्स सांगितल्या आहेत. त्यात सांगण्यात आलं आहे की, कोणती लक्षणे दिसल्यावर तुम्हाला चिकित्सक मदतीची गरज लागेल.

फ्लूसारखी लक्षणे दिसत असतील तर काय करावं?

जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्हाला किंवा तुमच्या घरातील सदस्यापैकी कुणाला फ्लूसारखी लक्षणे असतील तर सावध व्हा. अशावेळी सर्वातआधी डॉक्टरांना फोन करा आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा. फ्लूसारखी लक्षणे दिसत असतील तर जास्त घाबरून जाण्याची गरज नाही.

थेट हॉस्पिटलमध्ये जाऊ नका

केवळ शंका असेल तर थेट डॉक्टरांना भेटण्यासाठी जाऊ नका. आधी त्यांच्याशी फोनवर बोला आणि सविस्तर माहिती घ्या. गरज असेल तरच हॉस्पिटलमध्ये जावे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून माहिती घेऊ शकता.

कोरोनाची लक्षणे लक्षणे दिसत असतील तर लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊ नका. कारण हॉस्पिटलमध्ये संभावित कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्ण पोहोचण्याआधी तिथे काही नियमांचं पालन केलं जात आहे. जेणेकरून स्टाफ आणि इतर रूग्णांना संक्रमणाचा धोका होऊ नये.

इमरजन्सी रूममध्ये जाण्याची घाई नको

कोरोना व्हायरसने संक्रमणाची लक्षणे दिसत असतील तर अजिबात घाई न करता कोणत्याही हॉस्पिटलच्या इमरजन्सी रूममध्ये जाऊ नका. अनेक हॉस्पिटल्सच्या इमरजन्सी रूममध्ये खूप सारे रूग्ण असतात. त्यांनाही याची लागण होऊ शकते. 

जर तुम्ही कोणतंही कारण नसताना केवळ फ्लूसारखी लक्षणे दिसल्यावर इमरजन्सी रूममध्ये जात असाल तर डॉक्टरांसाठीही हे अडचणीचं ठरू शकतं. कारण ते त्यावेळी इतर रूग्णांवर उपचार करत असतील. तर इतर रूग्णांचा जीव धोक्यात जाऊ शकतो.

मुख्य मुद्दा हा आहे की, सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर सरकारने जारी केलेल्या फोन नंबरवर फोन करून तुम्हाला काय होतंय ती माहिती द्या आणि त्यांच्याकडून माहिती घ्या. त्यानंतर ते देतील त्या सूचनांचं पालन करा. 


Web Title: Coronavirus : What to do if you loved one show symptoms test positive covid 19 api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.