भारीच! आता बिल गेट्स यांनी सांगितलं; भारतात कधी येणार कोरोनाची लस; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 05:44 PM2020-09-15T17:44:48+5:302020-09-15T17:51:29+5:30

Corona Vaccine News & Latest Updates : पुढच्या वर्षांच्या पहिल्या तीन महिल्या कोरोनाच्या अनेक लसी या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या असतील.

CoronaVirus : When will corona vaccine come bill gates gives time line for covid vacccine | भारीच! आता बिल गेट्स यांनी सांगितलं; भारतात कधी येणार कोरोनाची लस; जाणून घ्या

भारीच! आता बिल गेट्स यांनी सांगितलं; भारतात कधी येणार कोरोनाची लस; जाणून घ्या

Next

(Image Credit- Philadelphia inquirer.com, Fox Business)

कोरोनाचा प्रसार जगभरात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोना व्हायरसवर मात करणारी आणि माहामारीला आटोक्यत आणणारी लस येण्यासाठी जगभरातील लोक प्रतिक्षेत आहेत. दरम्यान मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कोरोना लसीबाबत सकारात्मक माहिती दिली आहे. बील गेट्स यांनी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला किमान 3 लशी बाजारात येतील, अशी आशा व्यक्त केली आहे. 

कोरोनाची लस तयार करत असलेल्या ६ पैकी ३ कंपन्यांच्या लसी पुढच्या वर्षी उपलब्ध होतील. असं गेट्स म्हणाले. पुढच्या वर्षांच्या पहिल्या तीन महिल्या कोरोनाच्या अनेक लसी या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या असतील. वृत्तसंस्था PTI शी बोलताना त्यांनी लशीबद्दलचं त्यांचं मत व्यक्त केलं. कोरोना लशीच्या निर्मितीमागे भारताची भूमिका जगात फार महत्त्वाची ठरणार आहे. इतर देशांमध्ये तयार होणाऱ्या लशींपेक्षा पाश्चिमात्य देश तयार करत असलेली लस त्यांना अधिक खात्रीलायक वाटते, कारण पाश्चिमात्य देशांमध्ये लस निर्मितीपूर्वीच्या चाचण्यांचे निकष अधिक कठोर आणि दर्जात्मक आहेत.

त्यामुळे याच लशींकडून जगाला जास्त आशा आहे. पाश्चिमात्य देशातील काही कंपन्याशी भारतीय कंपन्यांनी उत्पादनासाठी करार केले आहेत. भारत कोरोना लशीचं उत्पादन करणारा जगातला सगळ्यात बलाढ्य देश ठरेल, असंही गेट्स म्हणाले.कोरोनाच्या वाढत्या प्रसारात  जगभरातील लस निर्मीतीच्या प्रक्रियेवर  लक्ष ठेवून असणाऱ्या बिल गेट्स लसीबाबत व्यक्त केलंलं मत हे दिलासादायक ठरलं आहे. 

लस तयार होण्यासाठी नेमका किती लागतो कालावधी?

पहिला टप्पा : रिसर्च अँड डेव्हलपमेंट

या प्रक्रियमध्ये दोन ते चार वर्षांचा कालावधी लागतो. मात्र कोरोनावरील लसीच्या या प्रक्रियेत जलद काम सुरु आहे. यामागील कारण असे आहे की, चीन सरकारला जानेवारीत विषाणूचा जेनेटिक सिक्वेंस आढळला होता. त्यावेळी कोरोना विषाणू फक्त चीनमध्ये होता. जास्तकरून लस ही विषाणूच्या प्रोटीनऐवजी त्यांच्या जेनेटिक स्विक्वेंसच्या आधावर असते.

दुसरा टप्पा : प्री-क्लिनिकल

रिसर्च आणि डेव्हलपमेंट पूर्ण झाल्यानंतर, या लसीची चाचणी प्राणी आणि झाडांवर केली जाते. यामध्ये त्यांची क्षमता आणि कामकाज यांचे विश्लेषण केले जाते. यावेळी लस दिल्यानंतर प्राणी आणि झाडांची प्रतिकार शक्ती वाढते की नाही, हे संशोधक पाहणी करतात. जर लसीचा प्रभाव झाला नाही, तर पुन्हा लसीची चाचणी पहिल्या टप्प्यावर जाते, त्यामुळे प्रक्रिया पुन्हा लांबते.

तिसरा टप्पा : क्लिनिकल ट्रायल

लस तयार करण्याचा हा सर्वात संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा असतो. कारण, लसीच्या क्षमतेची चाचणी मानवावर केली जाते. या टप्प्यात 90 महिन्यांपर्यंत किंवा सात वर्षांपेक्षा जास्त कालावधी घेण्याची क्षमता ठेवली आहे. या टप्प्यात सुद्धा आणखी तीन टप्पे असतात. यात बरेच असे उमेदवार आहेत, जे दुसऱ्या टप्प्यात यशस्वी होतात. परंतु तिसऱ्या टप्प्यात अपयशी ठरतात. 

1) या लसीचा उपयोग लोकांच्या लहान समुहावर केला जातो आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत की नाही याची तपासणी केली जाते. याला सुमारे तीन महिने लागू शकतात.
2) ज्या लोकांना लस द्यावयाची आहे, त्यांची संख्या हजारोपर्यंत वाढविली जाते. यासाठी सरासरी 6 ते 8 महिने लागू शकतात. यामध्ये रोगाची प्रतिकारशक्ती (इम्यून रिस्पॉन्स) विकसित झाली की नाही हे पाहिले जाते. यावेळी लसीच्या सामान्य आणि उलट प्रतिक्रिया निर्माण होण्याच्या क्षमतेचे देखील विश्लेषण केले जाते. कोरोना विषाणूच्या बाबतीत हा टप्पा छोटा करण्यात आला आहे, कारण काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्यामध्ये असणारे बरेच उमेदवार आता क्लिनिकल ट्रायल टप्प्यात पोहोचले आहेत.
3) हजारो लोकांवर लसीचे मूल्यांकन  केले जाते आणि जास्त लोकांमध्ये ही लस कशी कार्य करते, हे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी पुन्हा 6 ते 8 महिने लागू शकतात.

चौथा टप्पा : रेग्युलेटरी रिव्यू (नियामक पुनरावलोकन)

मानवी चाचण्यांचे अनेक टप्पे यशस्वी झाल्यानंतर लस निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत जाण्यापूर्वी नियामक समर्थनाची आवश्यकता असते. सामान्यत: याला बराच वेळ लागतो, परंतु अशा सार्वजनिक आपत्कालीन परिस्थितीत, कालावधी कमी केला जाऊ शकतो.

पाचवा टप्पा : मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी कंट्रोल (उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण)

या टप्प्यात, लस तयार करणार्‍या कंपनीला चांगल्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक संसाधनांची आवश्यकता असते, जेणेकरुन लस तयार करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू केली जाऊ शकेल.

हे पण वाचा-

अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

Web Title: CoronaVirus : When will corona vaccine come bill gates gives time line for covid vacccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.