Coronavirus : काही कोरोना व्हायरस रूग्णांचं ऑक्सिजन वेगाने होतं कमी आणि मग वाढतो धोका....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 03:04 PM2020-06-12T15:04:46+5:302020-06-12T15:14:11+5:30
महत्वपूर्ण रिसर्च समोर आला आहे. या रिसर्चमधून समोर आले आहे की, कोविड 19 च्या रूग्णांना हे कळतंच नाही की, त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे.
कोरोना व्हायरसवर उपचार शोधण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत करत आहेत. पण अजूनही हवं तसं यश हाती लागलं नाही. दुसरीकडे कोरोनाचं संक्रमण थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान यासंबंधी वेगवेगळे रिसर्च समोर येत आहेत. असाच महत्वपूर्ण रिसर्च समोर आला आहे. या रिसर्चमधून समोर आले आहे की, कोविड 19 च्या रूग्णांना हे कळतंच नाही की, त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे.
या आजाराबाबत सुरूवातीपासूनच हे सांगितलं जात आहे की, यात असे अनेक रूग्ण आहेत ज्यांच्यात या आजाराची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. लक्षणे नसलेल्या रूग्णांची संख्याही गंभीररूपाने अधिक आहे.
WHO नुसार, लक्षणे नसलेल्या रूग्णांची संख्या 80 टक्के असते. तेच 15 टक्के रूग्ण असे असतात ज्यांच्यात गंभीर लक्षणे दिसतात. अशा रूग्णांना ऑक्सिजनची गरज असते. आणि नंतर केवळ 5 टक्के असे असतात ज्यांची स्थिती फार नाजूक असते. आणि त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवावं लागतं.
जेव्हा एखादी व्यक्ती कोविड 10 ने संक्रमित होते तेव्हा शक्यता आहे की, त्याला कोविड निमोनिया झालेला असेल. ज्यात त्याला श्वासनलिकेत आणि फुप्फुसांमध्ये जळजळ होऊ लागले. त्याच्या फुप्फुसात पाणी भरलं जातं. अशात रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. काही केसेसमध्ये तर असं होतं की, रूग्णाला ऑक्सिजनची गरज पडते.
मात्र, आता असं आढळून येत आहे की, रूग्णांना त्यांच्यात ऑक्सिजन लेव्हल फार जास्त कमी झाली तरी कळत नाही. खासकरून त्या लोकांना ज्यांच्यात लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यांना ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याचं कळतच नाही. असं होण्याचं कारण म्हणजे आजाराच्या सुरूवातीच्या दिवासात ऑक्सिजनच्या कमतरतेचा प्रभाव रूग्णाच्या श्वसन तंत्रावर पडत नाही. याप्रकारे शांतपणे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असेल तर रूग्णाला कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे हार्ट अटॅक धोका असतो.
ज्या रूग्णांमध्ये लक्षणे नसतात आणि त्यांचं ऑक्सिजन कमी झालं तर त्यांच्या ऑक्सिजन लेव्हलवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. खासकरून सुरूवातीच्या दिवसात. ते सहजपणे श्वास घेत राहतात, पण त्यांना हे कळतंच नाही की, अडचण काय आहे. पण त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
या स्थितीची माहिती मिळवण्यासाठी ऑक्सीमीटर नावाचं उपकरण येतं. ते बोटावर क्लिपसारखं लावता येतं आणि त्याने ऑक्सिजनचं प्रमाण मोजता येतं. सामान्यपणे ऑक्सीमीटरवर 94-96 चं रिडींग योग्य स्थिती दाखवतं. पण हे प्रमाण 92 च्या खाली आलं तर चिंतेची बाब असू शकते. पण यावर डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा ठरतो.
मोठं यश! डासांच्या थूंकीपासून तयार केली जाईल सुपर वॅक्सीन, थांबेल जगभरातील महामारी...