कोरोनाच्या उपचारांसाठी वापरात असेल्या 'या' औषधांचे परिक्षण थांबवले, WHO सांगितलं कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 12:04 PM2020-06-18T12:04:07+5:302020-06-18T12:05:33+5:30
कोरोनातून बाहेर येत असलेल्यांची संख्या वाढत असली तरी मृतांचा आकडा आणि कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कोरोनाच्या माहामारीने संपूर्ण जगभरात कहर केला आहे. सर्वच देशातील तज्ज्ञ कोरोनावर लस किंवा औषध शोधण्यासाठी परिक्षण करत आहेत. कारण कोरोनातून बाहेर येत असलेल्यांची संख्या वाढत असली तरी मृतांचा आकडा आणि कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत WHOने मलेरियाचे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या परिक्षणांवर बंदी घातली आहे.
या औषधाच्या परिक्षणाबाबत तज्ज्ञ मुख्य अभ्यासक यांनी सॉलिडॅरिटी चाचणी, ब्रिटनमधील रिकव्हरी रिपोर्ट अन्य बाबी लक्षात घेऊन हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सर्वाधिक वापरात असलेले आणि प्रभावी ठरणारे हे औषध आहे.
सायन्स जनर्ल 'द लान्सेट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानंतर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या परिक्षणावर बंदी घालण्यात आलेली परंतु ही बंदी मागे घेण्यात आली होती. WHO ने दिलेल्या माहितीनुसार सॉलिडॅरिटी चाचणी, ब्रिटनमधील रिकव्हरी रिपोर्ट यांच्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांमुळं कोव्हिड-19चा मृत्यूदर कमी झालेला दिसून आला नाही. म्हणून या औषधाचे परिक्षण थांबवण्यात आलं आहे. ज्या रुग्णांवर याआधीच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा कोर्स सुरू आहे, त्यांना हे औषध वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे
सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा निर्णय फक्त सॉलिडॅरिटी ट्रायलशी निगडीत असून संसर्ग होण्यापूर्वी किंवा नंतर रुग्णांना देण्यास बंदी नाही. यापूर्वी लॅंसेट अभ्यासामध्ये असा दावा केला जात होता की या औषधामुळे रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने या औषधांच्या ट्रायलवर बंदी घातली होती. त्यावेळी WHO च्या या निर्णयाला विरोध झाला होता. कारण भारतातील सर्वाधिक कंपन्या हे औषध तयार करतात. अमेरिकेनं केलेल्या मागणीनंतर भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवरील बंदी हटवण्यात आली होती.
कोरोनाशी लढण्याासठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवेल व्हिटामीन सी; वाचा आरोग्यवर्धक फायदे
CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका