Coronavirus : अनेक देशांना कोरोनाबाबतची 'ही' चूक महागात पडेल, WHO कडून इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 12:17 PM2020-07-04T12:17:40+5:302020-07-04T12:18:45+5:30

रेयान यांनी प्रश्न विचारला की, काय तुम्ही ट्रान्समिशन घटवण्याशिवाय आणखी कोणत्या पद्धतीने व्हायरसवर कंट्रोल मिळवू शकता? जर नाही तर तुमच्याकडे लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही.

Coronavirus : World health organization urged countries to wake-up | Coronavirus : अनेक देशांना कोरोनाबाबतची 'ही' चूक महागात पडेल, WHO कडून इशारा!

Coronavirus : अनेक देशांना कोरोनाबाबतची 'ही' चूक महागात पडेल, WHO कडून इशारा!

googlenewsNext

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना व्हायरसने गंभीर रूपाने प्रभावित देशांना 'जागे' होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच वाद करण्याऐवजी वास्तविक स्थितीवर लक्ष द्या आणि महामारीवर कंट्रोल मिळवा, असाही सल्ला दिला आहे. WHO चे इमरजन्सीज डायरेक्टर माइक रेयान हे जिनेव्हातील पत्रकार परिषदेत म्हणाले की, लोकांनी जागे होण्याची गरज आहे आणि आकडेवारी व सत्य स्थिती खोटं बोलत नाही.

माइक रेयान म्हणाले की, अनेक देश आकडेवारीतून मिळालेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करीत आहेत आर्थिक कारणांसाठी उद्योग सुरू करण्याची गरज असू शकते, पण समस्येकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. ही समस्या काही जादूने दूर होणार नाहीये.

रेयान म्हणाले की, महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उशीर झालेला नाहीये. संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याऐवजी कमी संक्रमित भागांमध्ये काही प्रमाणात सूट दिली जावी. पण ज्या भागांमध्ये व्हायरसने थैमान घातलं आहे, तिथे कठोर पावले उचलली गेली पाहिजे. याशिवाय दुसरा पर्याय नाही.

माइक रेयान म्हणाले की, जर वेगवेगळ्या देशांनी लॉकडाऊन उघडले आणि त्यांच्याकडे वाढलेल्या केसेससोबत डील करण्याची क्षमता नसेल तर सर्वात वाईट स्थिती होईल. जर आरोग्य व्यवस्था रूग्णांवर उपचार करू शकणार नाही तर तर जास्त लोकांचा जीव जाईल.

रेयान पुढे म्हणाले की, काही देशांमध्ये हे गरजेचं असू शकतं की, केसेस वाढल्यावर पुन्हा नियम कठोर केले जातील. त्यांनी प्रश्न विचारला की, काय तुम्ही ट्रान्समिशन घटवण्याशिवाय आणखी कोणत्या पद्धतीने व्हायरसवर कंट्रोल मिळवू शकता? जर नाही तर तुमच्याकडे लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही.

coronavirus: चिंताजनक! कोरोना विषाणूने बदलले रूप, बनला पूर्वीपेक्षा नऊ पट अधिक खतरनाक

काय सांगता! हॉरर सिनेमांची आवड असणाऱ्यांना कोरोना व्हायरससोबत लढणं जाईल सोपं, पण कसं?

Web Title: Coronavirus : World health organization urged countries to wake-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.