देश-परदेश/ तिच्या पोटात 60 वर्षे राहिला गर्भ!

By admin | Published: August 7, 2015 12:06 AM2015-08-07T00:06:58+5:302015-08-07T00:06:58+5:30

91 वर्षीय आजीच्या

Country-abroad / her womb stuck for 60 years! | देश-परदेश/ तिच्या पोटात 60 वर्षे राहिला गर्भ!

देश-परदेश/ तिच्या पोटात 60 वर्षे राहिला गर्भ!

Next
91
र्षीय आजीच्या
पोटात 60 वर्षांचा गर्भ!
डॉक्टर चक्रावले: गरोदर राहूनही आयुष्यभर निपुत्रिक
वॉशिंग्टन: नऊ महिन्यांचे गर्भारपण पूर्ण झाले की माणसाचे मूल जन्माला येणे, हा सर्वसाधारणपणे आढळणारा निसर्गधर्म. पण चिलीमधील एका 91 वर्षांच्या वृद्धेने कधीही बाळंत न होता तब्बल 60 वर्षे पोटात गर्भ वागविल्याचे दिसून आल्याने तेथील डॉक्टरमंडळी चक्रावून गेली आहे!
‘सीएनएन’ने दिलेल्या वृत्तानुसार चिलीमधील ला बोसा शहरातील एस्टेला मेलेन्डेझ ही महिला पोटात कसला तरी गोळा आल्याची तक्रार घऊन आली तेव्हा तिला ट्युमर झाला असावा, अशी डॉक्टरांना शंका आली. तसे असेल तर शस्त्रक्रिया करून तो काढून टाकावा लागेल, असे सांगून डॉक्टरांनी तिचा एक्स-रे काढला. एक्स-रे पाहून डॉक्टर चक्रावून गेले. कारण तिच्या गर्भाशयात ट्युमर नव्हे तर पूर्ण वाढ झालेला व घ? गोळा होऊन राहिलेला गर्भ होता.
एस्टेलाकडून वैवाहिक जीवनाची माहिती घेऊन डॉक्टरांनी हा गर्भ निदान साठ वर्षे तरी तिच्या पोटात असावा, असा अंदाज बांधला. पण वाढ पूर्ण झाल्यावर एस्टेला वेळीच बाळंत होऊन हे मूल जन्माला कसे आले नाही, याचे कोडे डॉक्टरांना काही अद्याप उलगडलेले नाही.
एस्टेलाचे 74 वर्षांपूर्वी मॅन्युएल गोन्सालेझ यांच्याशी लग्न झाले. मॅन्युएल यांचे गेल्या जानेवारीत वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.
आपण गरोदर आहोत, असे आपल्याला कधी जाणवलेच नाही, असे एस्टेला यांचे म्हणणे आहे. आपल्याला एखादे मूल व्हावे, असे मला व माझ्या पतीला खूप वाटायचे. परंतु 74 वर्षे निपुत्रिक राहिल्याने आम्ही खूप सोसले, अशी खंत तिने व्यक्त केली. तरीही आम्हाला मनापासून हवे असलले मूल इतकी वर्षे माझ्या पोटात होते, ही गोष्टही आता या वयात समाधान देणारी आहे, असे म्हणून एस्टेला स्वत:ची समजूत काढून घेते.
खरे तर ‘कॅल्सिफिकेशन’ होऊन कचकड्यासारख्या झालेल्या या गर्भाने एस्टेलाच्या जीवाला धोका नव्हता. तरीही शस्त्रक्रिया करून तो काढता येईल का याचा डॉक्टरांनी विचार केला आणि शस्त्रक्रिया अधिक जीवावर बेतेल, असा निष्कर्ष काढून ती न करण्याचे ठरविले.
(वृत्तसंस्था)

Web Title: Country-abroad / her womb stuck for 60 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.