सावधान! कोरोनातून बरं झाल्यानंतरही दीर्घकाळ दिसताहेत ही लक्षणं; वाढतोय पोस्ट-कोविड सिंड्रोमचा धोका
By Manali.bagul | Published: March 1, 2021 07:40 PM2021-03-01T19:40:34+5:302021-03-01T19:41:26+5:30
CoroaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरसच्या निगेटिव्ह चाचणीनंतरही रुग्णाला बर्याच समस्यांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम एखाद्या व्यक्तीवर केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकरित्याही होतो.
कोरोना विषाणूचा साथीचा रोग जगभर पुन्हा पसरला आहे. सर्वसाधारणपणे, कोविड -१९ संसर्ग शरीरात बराच काळ टिकून राहतो. या काळात विचित्र लक्षणे दिसून येतात, ज्यांना संपूर्णपणे दूर करण्यासाठी बराच काळ लागू शकतो. कोरोना व्हायरसच्या निगेटिव्ह चाचणीनंतरही रुग्णाला बर्याच समस्यांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम एखाद्या व्यक्तीवर केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकरित्याही होतो.
कोरोना विषाणूच्या संसर्गाची कोणती लक्षणे दूर होण्यासाठी बराच काळ लागू शकतो. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एखाद्या व्यक्तीमध्ये तीव्र पोस्ट-कोविड सिंड्रोम विकसित होण्याचा धोका, जोखीम घटक संसर्गाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. तज्ञांनी कोरोना विषाणू-संक्रमित रूग्णांमध्ये सामान्य लक्षणांची नमुने पाहिली आहेत, जी बराच काळ टिकून राहतात.
वास न येणं
नाकाच्या संवेदनांमध्ये व्हायरल इन्फेक्शनने ग्रस्त लोकांना वास, गंध येत नाही. हे लक्षण बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो. अशा लक्षणांनी ग्रस्त असलेल्या रुग्णाला अनेक चाचण्या घ्याव्या लागतात. शास्त्रज्ञांच्या मते नाकाच्या समर्थक पेशींवर विषाणूच्या हल्ल्यामुळे ही समस्या उद्भवते आहे.
सावधान! लवकर झोपल्याने असतो हार्ट अटॅकचा अधिक धोका, रिसर्चमधून खुलासा...
थकवा येणं
कोरोना विषाणूच्या रुग्णांना या आजाराशी झुंज देण्याच्या आठवड्यानंतर अधिक थकवा जाणवतो. शरीर विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करण्यात व्यस्त असते, ज्यामुळे थकवा येतो. त्याच वेळी, रोगप्रतिकारक शक्ती देखील सायटोकिन्स तयार करते ज्यामुळे थकवाची लक्षणे उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी निरोगी आहार आणि पाण्याचे पुरेसे सेवन आवश्यक आहे.
अरे व्वा! कोरोना लसीचा चमत्कार; कोरोनापासून बचावासह इतरही आजार झाले दूर, महिलेनं सांगितला अनुभव...
श्वास घ्यायला त्रास होणं
कोविड -१९ च्या रूग्णांमध्ये श्वास घ्यायला त्रास होणं ही एक सामान्य लक्षण आहे. जरी बर्याच प्रकरणांमध्ये लक्षणे काही वेळाने दूर होतात, तर काही रुग्णांना सपोर्ट मशीनची आवश्यकता असते. संशोधकांच्या मते, आधीच श्वसन समस्येने ग्रस्त असलेल्या रूग्णांना श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो आणि फुफ्फुसांनाही नुकसान होऊ शकते. यावर मात करण्यासाठी श्वसनाचा व्यायाम हा एक चांगला मार्ग आहे.
डोकेदुखी
कोविड -१९ पासून पीडित रूग्णाला डोकेदुखी तसेच व्हर्टीगो सारखी लक्षणे अनुभवतात. ही लक्षणे बराच काळ टिकून राहतात. हे संसर्गाचे एक प्रारंभिक लक्षण आहे. डोकेदुखी शरीरात सूज किंवा मज्जातंतूच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. अशी लक्षणे पाहिल्यावर त्वरित डॉक्टरकडे जावे.
शारीरीक वेदना
विषाणूमुळे स्नायू, तंतूचे नुकसान होते ज्यामुळे शरीरात वेदना होते. तसेच, कंबर आणि पाठदुखी आणि सांध्यांमध्येदेखील वेदना आणि तणाव जाणवतो. ही लक्षणे बराच काळ टिकू शकतात. नियमित व्यायाम केल्यास ही लक्षणे सुधारू शकतात.