चिंता वाढली! इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या पाचपैकी एका रुग्णाला कोरोना संक्रमणाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 01:02 PM2020-06-17T13:02:49+5:302020-06-17T13:04:57+5:30

इतर आजारांनी पिडित असलेल्या पाचपैकी एका रुग्णांला कोरोनाच्या संक्रमणाचं शिकार व्हावं  लागत आहे. 

Covid 19 infection is possible to be spreading in one in five patients suffering from other diseases | चिंता वाढली! इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या पाचपैकी एका रुग्णाला कोरोना संक्रमणाचा धोका

चिंता वाढली! इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या पाचपैकी एका रुग्णाला कोरोना संक्रमणाचा धोका

Next

कोरोनाचे संक्रमण सध्या वेगाने जगभरात वाढत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढले असेल तरी  कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. कोरोनाच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्ण इतर आजारांनी पिडित असलेल्या पाचपैकी एका रुग्णांला कोरोनाच्या संक्रमणाचं शिकार व्हावं  लागत आहे. 

लँसेंट ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून तज्ज्ञांनी हा दावा केला आहे. असं झाल्यास जगभरातील ३४.९कोटी रुग्णांना संक्रमणाचा सामना करावा लागेल. तसंच त्यांना रुग्णांलयत भरती करण्याची गरज भासू शकते. भविष्य काळात रुग्णांलयांवर अतिरिक्त भार  येऊ शकतो. याची सुचना या अभ्यासातून मिळत आहे. ही बाब चिंताजनक आहे. 

लंडन स्कुल ऑफ हाइजीन एंड ट्रॉपिकल मेडिसिनचे प्रमुख एंड्रयू क्लार्क यांनी दिलेल्या माहितीनुसार डायबिटीस आणि मधुमेह तसंच हदयरोग यांसारखे आजार असलेले रुग्ण हाईरिक्स ग्रुपमध्ये आहेत. या आधारावर हे संशोधन करण्यात आलं होतं. यासह ग्लोबल बर्डन ऑफ डिजीज सारख्या व्यापक माहामारीच्या डेटावर अभ्यास करून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पण इतर आजारांनीग्रस्त असलेल्या सगळ्याच लोकांना संक्रमण होऊ शकतं असं म्हणणं योग्य ठरणार नाही. 

जगभरातील ७ अब्ज लोक वेगवेगळ्या आजारांनीग्रस्त आहेत. तज्ज्ञांना दिसून आले की १.७ अब्ज लोक  गंभीर किंवा दीर्घकालीन आजारांनी पिडित  आहेत. या रुग्णांमधील पाचपैकी एका रुग्णाला संक्रमणाचा धोका असू शकतो.  त्यामुळे ३४.९ लोकांना संक्रमणाचं शिकार व्हावं लागू शकतं. 

हृदय रोग किंवा इतर आजारांनी पिडीत असलेले लोक कोरोनाग्रस्त होण्यामागे सामाजिक कारणं सुद्धा आहेत. त्या व्यक्तीची मिळकत, आरोग्य सेवांचा अभाव, शिक्षणाचा अभाव, रोजगाराची स्थिती सुद्धा संक्रमणाने बाधित होण्यामागे आहेत. असं मत कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक नीना श्वाल्बे यांनी स्पष्ट केले आहे. 

युरोपमध्ये सगळ्यात  जास्त धोका

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार  तरूणांची संख्या जास्त असलेल्या आफ्रिका यांसारख्या देशात हा धोका कमी असू शकतो. दरम्यान त्या ठिकाणी एचआईव्ही जास्त असलेल्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचं संक्रमण पसरू शकतं. युरोपमध्ये जास्त वयाचे लोक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे  समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यातून संक्रमण पसरण्याचा धोका जास्त आहे. 

आता कोरोना रुग्णांचा जीव वाचवणार 'डेक्सामेथासोनस'; जाणून घ्या औषधाचे फायदे आणि तोटे

Coronavirus : कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना जीवनदान देणाऱ्या 'डेक्झामेथॅसोन' औषधाबाबत WHO काय म्हणाली?

Web Title: Covid 19 infection is possible to be spreading in one in five patients suffering from other diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.