खुशखबर! सिप्ला, हेट्रोनंतर आता 'या' कंपनीने लॉन्च केलं कोविड19 चं औषध; जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 04:10 PM2020-07-20T16:10:41+5:302020-07-20T16:15:26+5:30
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचे उपचार करण्यासाठी जोपर्यंत कोणतीही लस किंवा औषध मिळत नाही तोपर्यंत कंपन्यांना आपल्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
ग्लोबल फार्मास्युटिकल कंपनी Mylan ने सोमवारी कोविड 19 ची गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी DESREMTM या ब्रॅण्डने रेमडेसीवीरचे जेनेरिक औषध लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हेट्रो ड्रग्स लिमिटेड (Hetero Drugs Ltd) आणि सिप्ला लिमिटेड (Cipla Ltd) नंतर लॉन्च होणारं हे तीसरं औषध आहे. या औषधांच्या निर्मातीसाठी (DCGI) ने जून महिन्याच्या सुरुवातीला परवागनी दिली होती. कंपनी Mylan ने जेनेरिक औषध तयार करण्याची रेमडेसीवीरची पहिल्या टप्प्यातील उत्पादन सुरू केले असून वाढती मागणी लक्षात घेता संपूर्ण देशभरात औषधाचे वितरण करण्यासाठी उत्पादन केले जाणार आहे.
ग्लोबल फार्मा कंपनी बेंगलुरूमध्ये इंजेक्टेबेल सोयी सुविधांच्या आधारावर डेस्रेमटीएम या औषधांची निर्मीती केली जाणार आहे. भारतात या औषधाचे मार्केटींग केले जाणार असून इतर बाजारांमध्येही निर्यात केली जाणार आहे. या औषधासाठी कंपनी गिलियड सायंजेसकडून लायसेंस मिळवले आहे.
गिलियड कंपनीने भारतासह १२७ निम्न आणि मध्यम लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये नोवेल कोरोना व्हायरसच्या जेनेरिक औषधांच्या लायसंस, विक्री यांसाठी Mylan, सिप्ला, हेट्रो ड्रग्स, जुबिलेंट लाइफ साइंसेज लिमिटेड आणि पाकिस्तानातील फिरोजंस लॅबोरेट्रीज लिमिटेडसोबतच्या करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. याशिवाय अन्य चार कंपन्यासोबत करार केला आहे. जेणेकरून परिणामकारक औषध लवकरात लवकर मिळवता येईल.
काय असेल किंमत
सिप्लाने रेमडीसिवीर सिप्रेमी या औषधाची किंमत ४ हजार रुपये इतकी ठेवली आहे. हेट्रोने आपला ब्रँण्ड कोविफर याची किंमत ५ हजार ४०० रुपये इतकी ठेवली आहे. Mylan ने आपल्या उत्पादनाची किंमंत ४ हजार ८०० रुपये इतकी ठेवली आहे. अमेरिकी फार्मा गिलियड कंपनीने सौजन्यमुक्त आधारावर लायसेंस दिले आहेत. तर जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचे उपचार करण्यासाठी जोपर्यंत कोणतीही लस किंवा औषध मिळत नाही तोपर्यंत कंपन्यांना आपल्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी
धोका वाढला! कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू पसरण्याचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' कारण