कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका? एक्सपर्ट म्हणाले - घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 01:20 PM2021-05-15T13:20:09+5:302021-05-15T13:20:43+5:30
डॉक्टरांनी सांगितलं की, प्रशासकिय स्तरावर तयारी करणं एक चांगला विचार आहे. पण तिसऱ्या लाटेला घाबरण्याचं किंवा चिंता करण्याची गरज नाही.
असा अंदाज लावला गेला आहे की कोविड-१९ च्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेचा (Coronavirus Third wave) प्रभाव लहान मुलांवर अधिक होणार आहे. त्यामुळे सरकारी स्तरावर त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, प्रशासकिय स्तरावर तयारी करणं एक चांगला विचार आहे. पण तिसऱ्या लाटेला घाबरण्याचं किंवा चिंता करण्याची गरज नाही. कारण याचे काही पुरावे नाही की, तिसरी लाट लहान मुलांना जास्त प्रभावित करेल.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बालरोग तज्ज्ञ आणि वॅक्सीन तज्ज्ञ डॉ. संजय मराठे म्हणाले की, याचे कोणतेही कागदोपत्री किंवा महामारी विज्ञानानेच पुरावे नाही की, संभावित तिसऱ्या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात प्रभावित होतील. सगळं काही आकड्यांवर आधारित आहे.
घाबरण्याची गरज नाही
डॉ. संजय मराठे म्हणाले की, सरकारच्या अंदाजाच्या आधारावर तयारी सुरू करण्यात आली आहे. जी चांगली बाब आहे. आपल्याला भविष्यात लहान मुलांसाठी हॉस्पिटल्स आणि जास्त बेड्सची तसेच आयसीयूची गरज आहे. पण याने आई-वडिलांनी घाबरण्याची गरज नाही. (हे पण वाचा : फक्त ताप, खोकला नाही तर या नव्या लक्षणांनी ओळखा कोरोना झालाय की नाही; वाचा तज्ज्ञांचा सल्ला)
जे अमेरिकेत होतं ते भारतात होईल असं नाही
इतर देशांच्या अनुभवाबाबत विचारलं असता डॉ. मराठे म्हणाले की, संयुक्त राज्य अमेरिकेत त्यांच्या दुसऱ्या लाटेत संक्रमित लहान मुलांची संख्या वाढली आहे. पण आपण भारतात यूएसएमधील पॅरामीटर लागू करू शकत नाही. आपली परिस्थिती वेगळी आहे. त्यासोबतच वयस्कांसाठी लस उपलब्ध आहे. त्यामुळे मोठी लोकसंख्या आता सुरक्षित आहे.
हा गणितीय अंदाज
बाल रोग तज्ज्ञ डॉ. संजय देशमुख यांनी या भविष्यवाणी मागचं गणित समजावलं. ते म्हणाले की, पहिल्यांदा कोरोनाची लाट आली होती तेव्हा एकूण रूग्णांपैकी २ टक्क्यांपेक्षा कमी लहान मुले होते. दुसऱ्यात ही टक्केवारी वाढून ११ झाली. त्यामुळे संभावित तिसऱ्या लाटेत जवळपास २८-३० टक्के रूग्ण लहान मुले असतील. ते म्हणाले की, गणितीय अंदाज प्रत्यक्षात उतरेलच हे गरजेचं नाही. (हे पण वाचा : कोरोना रुग्णांना लस का देत नाही? दोन डोस वेगवेगळ्या कंपनीचे घेऊ शकतो का? जाणून घ्या)
मुलांमध्ये नॅच्युरल इम्युनिटी
डॉ. संजय म्हणाले की, क्लीनिकल फॅक्ट हे आहे की लहान मुलांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती असते. भारतीय लसीकरण कार्यक्रम आणि त्याच आधारावर त्यांचं लसीकरण होत असतं. पण लहान मुलांच्या उपचारासाठी विशेष प्रोटोकॉलची गरज असते. त्यामुळे आम्ही आमच्या आरोग्यकर्मींना प्रशिक्षण देणं सुरू केलं. तयारीत काहीच गैर नाही.
संक्रामक रोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे म्हणाले की, ० ते १० वयोगटातील मुले नैसर्गिक रूपाने सुरक्षित असतात. ते म्हणाले की, १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये व्हायरल रिसेप्टर्स फार कमी असतात संक्रमित झाल्यावरही त्यांना व्हायरल लोड शून्य असतो आणि ते वेगाने बरे होतात. त्यानंतर ११ ते १८ वयोगटातील मुले येतात.