सावधान! कोरोना टेस्टसाठी वापरली जाणारी स्वॅब स्टीकही घेऊ शकते जीव, थोडक्यात वाचला एका महिलेचा जीव
By अमित इंगोले | Published: October 3, 2020 11:30 AM2020-10-03T11:30:35+5:302020-10-03T11:33:19+5:30
अमेरिकेतील एक महिला स्वॅब टेस्ट करण्यासाठी गेली होती. टेस्टनंतर कोरोनाचं तर काही समजलं नाही, पण महिलेची स्कल(डोक्याची) वॉल्स डॅमेज झाली.
कोरोना व्हायरसची टेस्ट करण्यासाठी गेलेल्या महिलेची स्वॅब टेस्टनंतर अशी काही हालत झाली की, ऐकून तुम्ही हैराण व्हाल. ही घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अमेरिकेतील एक महिला स्वॅब टेस्ट करण्यासाठी गेली होती. टेस्टनंतर कोरोनाचं तर काही समजलं नाही, पण महिलेची स्कल(डोक्याची) वॉल्स डॅमेज झाली.
timesofindia.indiatimes.com ने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेचं वय ४० वर्षे आहे. हॉस्पिटलमध्ये स्वॅब टेस्टनंतर महिलेला नाकात वेदना जाणवत होत्या आणि तिच्या नाकातून द्रव्य बाहेर येत होतं. चौकशीनंतर समोर आलं की, स्वॅब टेस्टमध्ये वापरण्यात आलेल्या स्टीकने तिच्या स्कलची आउटर वॉल्स डॅमेज झाली. ज्यामुळे तिच्या नाकातून ब्रेन फ्लुइड लीक होऊ लागलं. सुदैवाने महिलेची तब्येत आता सुधारत आहे. पण जर तिच्यावर वेळीच उपचार झाले नसते तर तिच्या मेंदूमध्ये जीवाला धोका निर्माण करणारं इन्फेक्शन झालं असतं.
सायनसवाल्यांनी रहा सावध
ही केस पाहता हॉस्पिटल्सनी त्यांच्या स्टाफना या टेस्टची प्रोसेस अधिक चांगल्या प्रकारे शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकांची टेस्ट केवळ प्रोफेशनल्सकडूनच झाली पाहिजे. हेल्थ केअर प्रोफेशनल्सनी रूग्णींची पास्ट हेल्थ हिस्ट्री लक्षात घेतली पाहिजे. त्यानुसार कोविड टेस्टचे प्रोटोकॉल्स बदलले पाहिजे. खासकरून त्या रूग्णांसाठी ज्यांची स्कल रिलेटेड सर्जरी झाली असेल किंवा ज्यांना सायनसची समस्या असेल.
भारतात दावा केला जात होता की, स्वॅब टेस्टसाठी वापरली जाणारी स्टीक ब्लड ब्रेन बॅरिअरपर्यंत जाऊन सॅम्पल घेत आहे. पण दावा अजून सिद्ध होऊ शकलेला नाही. कोरोना व्हायरसच्या टेस्टसाठी लोकांना स्वॅब टेस्टच्या वेदनादायी प्रोसेसमधून जावं लागत आहे. या टेस्टमध्ये एक स्वॅब स्टीक नाकाच्या आत टाकली जाते. ज्याने भल्या-भल्यांच्या डोळ्यात पाणी येतं.