मुलांमध्ये कोरोना वॅक्सीन घेतल्यावर दिसू शकतात 'हे' सामान्य साइड इफेक्ट्स, काय घ्यावी काळजी?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 11:22 AM2022-01-06T11:22:51+5:302022-01-06T11:23:48+5:30
Corona Vaccination : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दिवशी ३० लाख मुलांना कोरोनाची वॅक्सीन दिली गेली. तर आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त मुलांचं वॅक्सीनेशन झालं आहे.
Corona Vaccination : ३ जानेवारी २०२२ पासून देशात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना कोरोना वॅक्सीन (Corona Vaccine) दिली जात आहे. राज्य सरकारांनीही मुलांच्या वॅक्सीनेशनची वेगळी व्यवस्था केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दिवशी ३० लाख मुलांना कोरोनाची वॅक्सीन दिली गेली. तर आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त मुलांचं वॅक्सीनेशन झालं आहे.
रेडिक्स हॉस्पिटलचे डॉक्टर रवि मलिक यांनी 'आजतक'ला सांगितलं की, 'पालकांनी हे लक्षात ठेवावं की, वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावर मुलं एकाएकी सुपरमॅन होणार नाहीत. पहिल्या डोजनंतर ४ आठवड्याने त्यांना दुसरा डोज दिला जाणार आहे. त्यानंतर ४ आठवड्यांनी इम्यूनिटी विकसित होईल आणि तरीही पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे'.
तरूणांच्या वॅक्सीनेशनबाबत बराच उत्साह बघायला मिळत आहे आणि ते वॅक्सीन घेतही आहेत. अशात मुलांच्या पालकांनी मुलांची बेसिक काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ज्याप्रकारे १८ ते ६० प्लस वयोगटातील लोकांना वॅक्सीनेशन घेतल्यावर काही संभावित साइड इफेक्ट (Corona Vaccine Side Effect) दिसले होते. होऊ शकतं की, ते मुलांमध्येही दिसू शकतील. पण यात घाबरण्याची गरज नाही. याचे फारच हलके साइड इफेक्ट दिसतात.
लाल निशाण आणि वेदना
हातावर जिथे वॅक्सीन दिली जाते तिथे लाल निशाण किंवा वेदना होऊ शकते. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशननुसार, वॅक्सीनेशनचं लाल निशाण आणि वेदना कमी करण्यासाठी वॅक्सीनेशनच्या जागेवर थंड कापड लावावा.
मुलांमध्ये वॅक्सीनेशननंतर गुंगी येणे ही सामान्य बाब आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशननुसार, वॅक्सीनेशननंतर साधारण १५ मिनिटांपर्यंत बसून रहावं किंवा थोडा वेळ बेडवर पडून रहावं याने गुंगी जाईल. यासाठी वॅक्सीनेशन सेंटरवर डॉक्टर वॅक्सीनेटेड लोकांना थोड्या वेळासाठी आपल्या देखरेखीखाली ठेवतात.
हलका ताप
आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांनुसार, वॅक्सीनेशननंतर मुलांमध्ये हलका तापही येऊ शकतो. १८ ते ६० वयोगटातील लोकांना हलका ताप आल्यावर पॅरासिटामोल घेण्याचा सल्ला दिला गेला होता. जर मुलांनाही ताप आला तर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांना काही औषध किंवा टॅबलेट द्या.
थकवा आणि अंगदुखी
वॅक्सीन घेतल्यावर मुलांमध्ये थकवा आणि अंगदुखीसारखी समस्या दिसू शकते. जर तुम्हालाही मुलांमध्ये अशाप्रकारची लक्षणं दिसली तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, त्यांना आराम करू द्या आणि जास्तीत जास्त लिक्विड पदार्थ सेवन करण्यास सांगा.
चक्कर येणे
हा वॅक्सीनचा साइड इफेक्ट नाहीये. वॅक्सीनेशन झाल्यावर काही मुलांना चक्कर येऊ शकते. पण यामुळे घाबरण्याची गरज नाही. असं तेव्हाच होतं जेव्हा मुलं रिकाम्या पोटी वॅक्सीन घेतात. त्यामुळे पालकांनी मुलांना वॅक्सीनला जात असताना त्यांना काहीतरी खायला देऊन पाठवा.