सुखद धक्का... दुसरं तिसरं कुणी नाही; आता WHO नेच सांगितलं कोरोनाची लस कधी येतेय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 01:48 PM2020-06-19T13:48:21+5:302020-06-19T17:57:19+5:30

कोरोनाच्या माहामारीला नियंत्रणात आणण्याासाठी लस किंवा औषधाचा शोध लागणं गरजेचं आहे.

Covid 19 who scientist hopes for coronavirus vaccine by end of this year | सुखद धक्का... दुसरं तिसरं कुणी नाही; आता WHO नेच सांगितलं कोरोनाची लस कधी येतेय!

सुखद धक्का... दुसरं तिसरं कुणी नाही; आता WHO नेच सांगितलं कोरोनाची लस कधी येतेय!

Next

(Image credit- twitter)

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. कोरोना व्हायरसची लस आणि औषध शोधण्याासाठी जगभरातील देशांमध्ये शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या माहामारीला नियंत्रणात आणण्याासाठी लस किंवा औषधाचा शोध लागणं गरजेचं आहे. कारण अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडण्याची स्थिती आहे. अशा स्थितीत माहामारीचा सामना करता यावा यासाठी सगळ्याच देशांचे लक्ष लस कधी विकसीत होते याकडे लागले आहे. 

दरम्यान जागतीक आरोग्य संघटनेच्या प्रमुख डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी गुरूवारी सांगितले की, कोविड19 ची लस तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. या वर्षाच्या अखेरीस कोरोनाची लस होणार होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरिस कोरोनाशी लढण्यासाठी लस तयार होऊ शकते. असे वृत्त पीटीआयने दिलं आहे. मलेरियाचे औषध हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे संशोधन आणि परिक्षण रोखल्याची सुचनाही त्यांनी वेळी दिली आहे. 

WHO ने दिलेल्या माहितीनुसार सॉलिडॅरिटी चाचणी, ब्रिटनमधील रिकव्हरी रिपोर्ट यांच्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांमुळं कोव्हिड-19चा मृत्यूदर कमी झालेला दिसून आला नाही. म्हणून या औषधाचे परिक्षण थांबवण्यात आलं आहे.  ज्या रुग्णांवर याआधीच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा कोर्स सुरू आहे, त्यांना हे औषध वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 

१० कंपन्यांची मानवी परिक्षणाची सुरूवात झाली आहे. 

स्वामीनाथन यांनी सांगितले की, भविष्यात या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी १० ठिकाणी सुरू असलेल्या माणसांवरच्या परिक्षणापैकी तीन ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. लसीचा शोध लावणं ही खूप वेळ दीर्घकालीन आणि प्रक्रिया आहे तरी या वर्षाच्या अखेरीस लसीचा शोध लागल्यास कोरोनाच्या लढाईत मोठं यश येऊ शकतं. असंही त्यांनी स्पष्ट केले.

पुढे त्यांनी सांगितले की, "परिणामकारक लस येईपर्यंत हा नवा कोरोनाव्हायरस इतर इन्फ्लूएंझा व्हायरसप्रमाणे सिझनल व्हायरस होण्याची शक्यता आहे. ज्याचा उद्रेक वर्षातून एकदा किंवा दोनदा होईल. म्हणजे हा आजारच सर्वसामान्य होईल, त्यावेळी या  विषाणूंच्या संक्रमणाने लोक आजारी पडले तरी फारसा परिणाम दिसून येणार नाही.

जगभरात कोरोनाव्हायरसचे ८६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या चार लाखांपेक्षा जास्त आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे. भारतात सध्या १ लाखांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असले तरी निरोगी रुग्णांचा आकडा २ लाखांपेक्षा जास्त आहे. 

CoronaVirus News: कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या उलट्या, जुलाबाची लक्षणं काहीशी वेगळी... जाणून घ्या!

लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांचं होतंय नुकसान; संशोधनातून खुलासा

Web Title: Covid 19 who scientist hopes for coronavirus vaccine by end of this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.