'या' औषधाने फक्त २ दिवसात मरेल कोरोनाचा विषाणू; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 12:13 PM2020-04-28T12:13:04+5:302020-04-28T12:24:57+5:30

या औषधामुळे व्हायरसचे आरएनए  २४ ते ४८  तासात नष्ट होऊ शकतात.

Covid19 now claims to kill the virus in two days with anti parasite medicine myb | 'या' औषधाने फक्त २ दिवसात मरेल कोरोनाचा विषाणू; तज्ज्ञांचा दावा

'या' औषधाने फक्त २ दिवसात मरेल कोरोनाचा विषाणू; तज्ज्ञांचा दावा

googlenewsNext

(Image credit- PTI)

कोरोनाच्या महामारीने जगभरात भीतीचं  वातावरण निर्माण केलं आहे. कोरोना व्हायरसपासून लोकांना वाचवण्यासाठी आणि या महामारीचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. सध्या शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या उपचारासंबंधी एक दावा केला आहे. अमेरिकेच्या नॉर्थशोर यूनिवर्सिटीमधील संक्रमण रोग विशेषज्ञांनी दावा केला आहे की, अँटी पॅरासाइट (किटक मारण्याचं औषध) इन्वर्टीमायसिनचा वापर करून दोन दिवसाच व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं.

हे औषध सुरक्षित असून जगभरात सहज उपलब्ध होणारं आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील मोनाश बायोमेडिसिन डिस्कवरी इंस्टीट्यूटचे डॉ. काइली वॉगस्टाफ यांना रिसर्चदरम्यान दिसून आलं की, या औषधामुळे व्हायरसचे आरएनए  २४ ते ४८  तासात नष्ट होऊ शकतात.

कोरोना रुग्णात सुधारणा 

फ्लोरिडाच्या ब्रोवॉर्ड हेल्थ मेडिकल सेंटरचे डॉ. जॅक्स रॅज्टर यांनी सांगितलं की, कोरोनाने संक्रमित असलेल्या व्यक्तीवर या औषधाचा प्रयोग केल जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम  दिसून आले. फुप्फुसांचं नुकसान झालेल्या आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांमध्ये इन्वर्टीमायसिन या औषधाचा चांगला परिणाम दिसून आला. रुग्ण जितक्या लवकर तपासणीसाठी येतील, तितक्या लवकर उपचार करता येईल. काही रुग्णांवर या औषधाचा परिणाम दिसून येत नाही, कारण त्यांची शारीरिक स्थिती खूप गंभीर असते. 

इन्वर्टीमायसिन हे औषध पहिल्यांदा १९७०-८०मध्ये तयार करण्यात आलं होतं. याचा वापर प्राण्यांमधील किटकांना मारण्यासाठी केला जात होता. त्यानंतर या औषधाचा वापर माणसांच्या डोक्यात तयार होत असलेल्या उवा मारण्यासाठी केला जात होता. डब्ल्यूएचओने आवश्यक औषधांच्या सुचीमध्ये याचा समावेश केला आहे.

कोरोना हा व्हायरस आहे पॅरासाईट नाही. अशा स्थितीत हे औषध कोरोनाला कसं मारणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर शास्त्रज्ञांनी सांगितले की, इन्वर्टीमायसिनमध्ये वायरल आरएनए राइबो-न्यूक्लिक एसिड ब्लॉक करण्याची क्षमता असते. यामुळे संक्रमण वाढण्याची शक्यता कमी असते. तसंच व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर व्हायरसशी जास्त काळापर्यंत सामना केला जाऊ शकतो. ( हे पण वाचा-CoronaVirus : समोर आली कोरोनाची ६ नवी लक्षणं, त्यांच्याकडे करू नका दुर्लक्ष)

अमेरितील संस्था फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने  दिलेल्या माहितीनुसार ही औषध माणसांच्या शरीरासाठी किती परिणामकारक ठरतील याबाबत साशंकता आहे. या औषधाच्या वापराबाबत अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे. कोरोना वायरस च्या उपचारांसाठी इन्वर्टीमायसिन किती परिणामकारक ठरेल हे संशोधनातून दिसून येईल, असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. (हे पण वाचा- CoronaVirus : धोका वाढला! हॉटस्पॉटच्या हवेतही सापडले कोरोना विषाणूचे अंश)

Web Title: Covid19 now claims to kill the virus in two days with anti parasite medicine myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.