गायीचं तूप देईल तुम्हाला चिरतारुण्य आणि सौंदर्यही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:40 PM2017-08-19T14:40:07+5:302017-08-19T14:47:31+5:30
गायीच्या तुपातील शक्ती बनवेल तुम्हाला ताकदवान आणि राखेल अनेक आजारांपासून दूर..
- मयूर पठाडे
गायीचं तूप आरोग्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं. आयुर्वेदात तर गायीच्या तुपाला खूपच महत्त्व आहे. अनेक आजारांवर त्याचा उपयोग होतो. मात्र त्याचबरोबर गायीचं तूप वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं असंही काही जणांना वाटतं. त्यामुळे ते आहारातून गायीचं तूप कमी करण्याचा किंवा हद्दपार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र गायीचं तूप आरोग्यासाठी खरंच किती उपयुक्त आहे, याबाबत नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आणि त्यातून गायीच्या तुपाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
गायीच्या तुपात जे गुणधर्म आहेत, तेवढे म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या दुधात नाहीत, हेदेखील या संशोधनातून सिद्ध झालं.
काय आहेत गायीच्या तुपाचे उपयोग?
१) गायीच्या तुपावर काही जणांचा जो आक्षेप होता, की गायीचं तूप वजन वाढवतं, तो दावा चुकीचा असल्याचं या संशोधनातून सिद्ध झालं, याऊलट गायीचं तूप वजन घटवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.
२- गायीच्या तुपामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टोरॉलची लेव्हल योग्य प्रमाणात राहते. शिवाय चांगल्या कोलेस्टोरॉलचं प्रमाणही वाढतं.
३- पचनशक्ती वाढवण्यासाठी गायीचं तूप उत्तम आहे.
४- हृदयाच्या व्यवस्थित चलनवलनासाठीही गायीचं तूप महत्त्वाचं असल्याचं लक्षात आलं.
५- गायीच्या तुपाचा आणखी एक गुणविशेष म्हणजे त्यामुळे तुमच्या त्वचेला खºया अर्थान ‘निखार’ येतो आणि तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि चमकदार होते.
६- चयापचय क्रियेत गायीच्या तुपामुळे सुधारणा घडून येते.
७- कॅन्सरपासून लढण्यासाठी गायीच्या तुपापासून आपल्याला शक्ती मिळते.
८- अर्धशिशी, डोकेदुखी यासारख्या त्रस्त करणाºया विकारांपासूनही गायीच्या तुपामुळे मुक्ती मिळू शकते.
गायीचं तूप असं बहुगुणी आहे. त्याचा योग्य प्रमाणात जर नियमितपणे वापर केला गेला, तर अनेक अजारांपासून मुक्ती तर तुम्हाला मिळेलच, पण तुमचं आरोग्यही कायम उत्तम राहील.