हातांची बोटं कटाकटा मोडताना मजा येत असेल पण त्यामुळे होतो 'हा' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:54 PM2022-04-06T17:54:56+5:302022-04-06T17:57:38+5:30

बोटे मोडल्याने हातांना कसलाच फायदा होत नाही, उलट त्यामुळे बोटांची हाडे कमकुवत होत जातात. त्यामुळे ही सवय असेल तर वेळीच बंद करायला हवी. जाणून घेऊया बोटे मोडल्याने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो.

cracking knuckles and invite joint pain | हातांची बोटं कटाकटा मोडताना मजा येत असेल पण त्यामुळे होतो 'हा' गंभीर आजार

हातांची बोटं कटाकटा मोडताना मजा येत असेल पण त्यामुळे होतो 'हा' गंभीर आजार

Next

आपल्यापैकी अनेकांना बोटं मोडण्याची सवय असते, एखाद्या कामातून उसंत मिळाल्यानंतर अनेकजण हाताची बोटं मोडत राहतात. ही सवय बोटांच्या हाडांसाठी घातक ठरू शकते. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार वारंवार बोटे मोडल्यानं हाडांच्या समस्या उद्भवू शकतात. बोटे मोडल्याने हातांना कसलाच फायदा होत नाही, उलट त्यामुळे बोटांची हाडे कमकुवत होत जातात. त्यामुळे ही सवय असेल तर वेळीच बंद करायला हवी. जाणून घेऊया बोटे मोडल्याने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो.

बोटं मोडल्यानं नेमकं काय होतं
बोटे मोडण्याच्या सवयीमुळेदेखील सांधेदुखीचा त्रास वाढतो, असे अनेकांचे तंज्ज्ञांचे मत आहे. वास्तविक, बोटं मोडताना जसं होतं तसं शरीरातील सांधे क्रॅक होतानाही होतं. आपल्या शरीराच्या सांध्यामध्ये एक द्रवपदार्थ असतो, जेव्हा आपण बोटे मोडतो तेव्हा सांध्यांमधील या द्रवपदार्थांमधील वायू बाहेर पडतो. त्यामुळे आत तयार झालेले फुगेही फुटतात. यामुळे बोटांमध्ये क्लिक (कट) केल्यासारखा आवाज येतो. तुमच्या लक्षात आले असेल की, अनेकदा आपले सांधे आपोआप आवाज करतात. जेव्हा तुम्ही खूप वेगवान हालचाल करता तेव्हा असे घडते.

म्हणून बोटे मोडायची नाहीत
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वारंवार बोटे मोडल्याने हाताच्या पकडीच्या ताकदीवर परिणाम होतो. त्यामुळे कधी हाताला सूजही येऊ शकते. त्यामुळे बोटे मोडण्याची सवय बंद करायला हवी. वयोवृद्ध काळात याचा जास्त त्रास होऊ शकतो.

सांधेदुखीचा धोका
तज्ज्ञांचे मत आहे की, तुम्ही कधीतर बोटे मोडत असाल आणि तुम्हाला वेदना होत नसेल तर ते ठीक आहे. मात्र, जर तुम्ही सारखेच बोटे मोडत असाल तर तुम्हाला संधिवात होण्याचा धोका असतो.

Web Title: cracking knuckles and invite joint pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.