लघवीचा रंग अचानक बदललाय? असु शकतो 'हा' गंभीर आजार, आजच जाणून घ्या इतर लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 05:21 PM2022-07-22T17:21:48+5:302022-07-22T17:34:42+5:30
त्यामागे एखाद्या आजाराचे कारण आजार दडलेले असू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, लघवीचा रंग क्लियर दिसल्यास त्याचे कारण असू शकते.
लघवीचा बदलणारा रंग हे अनेक रोगांचे लक्षण असू शकते. जर लघवीच्या रंगात असामान्य बदल झाला तर ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. अनेक आजारांचे निदान करण्यासाठी मूत्र चाचणी केली जाते. यासोबतच मूत्रमार्गाची समस्याही याद्वारे ओळखता येते. मात्र जर तुमच्या लघवीचा रंग पिवळा दिसण्याऐवजी क्लियर म्हणजेच अगदी पारदर्शक दिसत असेल. तर त्यामागे एखाद्या आजाराचे कारण आजार दडलेले असू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, लघवीचा रंग क्लियर दिसल्यास त्याचे कारण असू शकते.
क्लियर युरीनची कारणे
मधुमेहामध्ये ही समस्या उद्भवते
मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये क्लियर यूरीनची समस्या असू शकते. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अनियमित झाल्यामुळे असे होते. या स्थितीत, शरीर शरीरातील अतिरिक्त साखर काढून टाकण्याचे कार्य करते. अशा परिस्थितीत सामान्यपेक्षा जास्त वेळा लघवीला जावे लागते.
किडनीचे आजार
तुम्हाला जर किडनीचा आजार असला. तर त्यामुळेही तुमच्या यूरीनचा रंग क्लियर म्हणजेच पारदर्शक असू शकतो. त्यामुळे असे झाल्यास तुम्ही तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
जास्त पाणी पिणे
झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने क्लियर यूरीनची समस्या उद्भवते. तुम्ही हे जाणून घेणे गरजेचे आहे की, जास्त पाणी पिणेदेखील धोकादायक ठरू शकते. कारण यामुळे शरीरातील सोडियमची पातळी कमी होते.