वाढत्या वजनाने आहात हैराण तर जिरं ठरेल फायदेशीर, जाणून घ्या कसा कराल वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 04:45 PM2019-07-04T16:45:14+5:302019-07-04T16:49:48+5:30
जिरं केवळ पदार्थांची टेस्ट वाढवतं असं नाही तर आरोग्यासाठीही अनेकदृष्टीने फायदेशीर असतं. जिऱ्याचा वापर सर्दी-खोकला यावरही औषधी म्हणून केला जातो.
(Image Credit : Forks Over Knives)
जिरं केवळ पदार्थांची टेस्ट वाढवतं असं नाही तर आरोग्यासाठीही अनेकदृष्टीने फायदेशीर असतं. जिऱ्याचा वापर सर्दी-खोकला यावरही औषधी म्हणून केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? की, जिऱ्याच्या मदतीने वजनही कमी केलं जाऊ शकतं. जे लोक सतत वाढत असलेल्या वजनामुळे हैराण आहेत आणि ज्यांचं वजन कंट्रोलमध्ये राहत नाहीये. त्यांच्यासाठी जिरं योग्य औषध आहे.
जिरं वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला वेगाने वाढवण्यासाठी मदत करतं. पण यासाठी जिऱ्याचा वापर योग्य पद्धतीने केला गेला पाहिजे.
जिऱ्यात फार कमी कॅलरी असतात. त्यासोबतच यात अॅँटी-इनफ्लेमेटरी प्रॉपर्टी सुद्धा असते आणि याने मेटाबॉलिज्मही सुधारतं. जिऱ्यामध्ये थायमोक्विनोन नावाचं एक तत्त्व असतं. याने शरीरातील फ्री रॅडिक्लसवर हल्ला केला जातो आणि त्यांना शरीरातून बाहेर काढलं जातं.
(Image Credit : misskyra.com)
एका रिसर्चनुसार, जर जिरं लिंबाच्या रसात मिश्रित करून सेवन केलं तर याने वजन कमी करण्यास मदत मिळते. जिरं किंवा जिऱ्यांचं पाणी सेवन केल्याने केवळ १५ ते २० दिवसात वजन कमी केलं जाऊ शकतं असा दावा अनेकजण करतात.
(Image Credit : WebMD)
एका दुसऱ्या रिसर्चनुसार, ८० लठ्ठ महिलांना दोन गटात विभागण्यात आले होते. एका ग्रुपला रोज जिऱ्याचं सेवन करण्यास सांगितलं गेलं तर दुसऱ्या ग्रुपला डायटींगवर ठेवलं. शेवटी असं आढळलं की, ज्या महिलांनी जिऱ्याचं सेवन केलं, त्यांचं वजन आधीच्या तुलनेत कमी झालं होतं.
कसं होतं वजन कमी?
(Image Credit : Live Science)
जिरं हे वेगाने कॅलरी बर्न करतं. असं करण्यासाठी जिरं मेटाबॉलिज्मची गती वाढवतं आणि पचनक्रियाही सुधारतं. जेव्हा पचनक्रिया चांगली होईल तेव्हा मेटाबॉलिज्म योग्य राहील. त्यामुळे याचा फायदा वजन कमी करण्यास होतो.
जिरं कसं वापराल?
१) २ चमचे जिरं घ्या आणि ते रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे जिऱ्याचं पाणी गाळून घ्या. या पाण्यात थोडा लिंबाचा रस टाका आणि सेवन करा. हे पाणी रोज रिकाम्या पोटी २ आठवडे सेवन करा.
२) एक चमचा जिरं पावडर दह्यात मिश्रित करा आणि साधारण १५ दिवस जेवण केल्यावर याचं सेवन करा.
३) एक कप पाणी उकडून त्यात एक चमचा जिरं पावडर टाका. त्यात थोडा लिंबाचा रस टाका. हे ड्रिंक रोज २० दिवस जेवण केल्यावर सेवन करा. फायदा दिसेल.
(टिप : वरील सल्ले केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी एक तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. हेही लक्षात घ्या की, जिऱ्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने नुकसानही होऊ शकतं. काही रिसर्चनुसार, टेस्टोस्टेरॉनचं प्रमाणही कमी करतं. हा एक सेक्स हॉर्मोन आहे.)