Health tips: स्वयंपाक घरातील 'हा' मसाला पोटदुखी आणि गंभीर आजारांवर आहे रामबाण, अत्यतं उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 09:49 AM2022-07-13T09:49:12+5:302022-07-13T09:56:05+5:30

जिऱ्यामध्ये आपल्या शरीरासाठी फायदेशीर असणारे इतके औषधी गुणधर्म (Cumin Medicinal Benefits) आहेत की, आयुर्वेदामध्ये जिऱ्याला औषधीदेखील म्हणले जाते. तर आज आपण याच जिऱ्याचे आपल्या आरोग्यासाठी (Cumin Benefits) काय काय फायदे आहेत ते बघणार आहोत.

cumin seeds are extremely beneficial for health know the benefits | Health tips: स्वयंपाक घरातील 'हा' मसाला पोटदुखी आणि गंभीर आजारांवर आहे रामबाण, अत्यतं उपयुक्त

Health tips: स्वयंपाक घरातील 'हा' मसाला पोटदुखी आणि गंभीर आजारांवर आहे रामबाण, अत्यतं उपयुक्त

googlenewsNext

भारतातील अनेक पदार्थ असे आहेत की, ज्यामध्ये फोडणी दिली जाते आणि त्यानंतर त्या पदार्थांची चव आणखी वाढते. या फोडणीमध्ये कांदा, लसूण असे नसले तरी चालते मात्र एक गोष्ट नक्कीच असते आणि ते म्हणजे जिरे. जिऱ्याची चव आणि त्याचा सुगंध जेवण अधिक चविष्ट बनवते. जिऱ्याला एक मसाला (Cumin Seeds) म्हणून वापरले जाते. परंतु जिऱ्यामध्ये आपल्या शरीरासाठी फायदेशीर असणारे इतके औषधी गुणधर्म (Cumin Medicinal Benefits) आहेत की, आयुर्वेदामध्ये जिऱ्याला औषधीदेखील म्हणले जाते. तर आज आपण याच जिऱ्याचे आपल्या आरोग्यासाठी (Cumin Benefits) काय काय फायदे आहेत ते बघणार आहोत.

पोटाच्या समस्यांवर प्रभावी उपाय
पोटाच्या समस्यांवर (Cumin For Stomach Problems) जिरे अतिशय प्रभावी उपाय आहे. जिऱ्याच्या पाण्यात आवश्यक तेल असते जे लाळ ग्रंथींना उत्तेजित करते. त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. तसेच गॅसच्या समस्येवरही जिरे सर्वात फायदेशीर घरगुती उपाय मानला जातो. यासाठी एक चमचा जिरे, छोटा अर्धा चमचा आलं आणि चिमुटभर सेंधा मीठ एकत्र बारीक करून घ्या आणि जेवणाआधी गरम पाण्यात घालून ते प्या.

आंबट ढेकर, गॅसच्या समस्येसाठी उपयुक्त
जिऱ्यामुळे पचनास मदत होते, आतडे उत्तेजित होतात आणि गॅस्ट्रिक समस्यांपासून (Cumin For Gases)आराम मिळतो. याशिवाय आंबट ढेकर येणे, गॅस किंवा अपचन झाल्यास जिरे भाजून खाल्ल्याने आराम मिळतो. यासाठी एक चमचा जिरे एका पॅनमध्ये भाजून घ्या. त्यात एक ग्लास पाणी घाला आणि पाच मिनिटे उकळू द्या. त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या आणि दिवसातून दोन वेळा हे कोमट पाणी प्या.

मासिक पाळीच्या वेदनांवर उपयुक्त
तुम्हाला मासिक पाळी (Cumin Benefits During Periods) दरम्यान वेदना होत असतील आणि तुम्हाला औषधांची मदत घ्यायची नसेल तर तुमच्यासाठी जिरे खूप उपयुक्त ठरू शकतात. जिरे, अँटिस्पास्मोडिक आणि अँटी-इन्फ्लेमेंटरी गुणधर्मांनी समृद्ध असतात. ते खाल्ल्याने वेदनापासून आराम मिळतो. यासाठी 50 ग्राम जिरे भाजून घ्या आणि त्यात 20 ग्राम गुळ घालून त्याच्या गोळ्या बनवा. मासिक पाळीच्या दोन ते तीन दिवस आधी या गोळ्या खाल्ल्यास तुम्हाला वेदना कमी होतील.

आईचे दूध वाढवण्यासाठी उपयुक्त
हरजिंदगीने दिलेल्या माहितीनुसार, नव मातांसाठी आवश्यक असलेल्या लोहाने जिरे समृध्द असतात. यामुळे आईचे दूध वाढवण्यास (Cumin To Increase Breast Milk) मदत होते. यासाठी एक चमचा जिरे भाजून घ्या. त्यानंतर ते एक ग्लास दूधात घाला. या मिश्रणात चवीनुसार साखर घाला आणि काही दिवस हे ड्रिंक प्या.

तुम्हीही जिऱ्याच्या मदतीने या 4 समस्यांवर सहज मात करू शकता. परंतु तुम्हाला आरोग्याशी संबंधित इतर समस्या असतील तर हा उपाय करून पाहण्याआधी एकदा तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

Web Title: cumin seeds are extremely beneficial for health know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.