पोटावरील चरबी कमी करण्यासाठी घरीच तयार करा हे खास ड्रिंक, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 10:27 AM2022-09-30T10:27:42+5:302022-09-30T10:27:58+5:30
Cumin Water as Weight Loss Drink: एक असं खास ड्रिंक आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. हे पेय तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने तयार करू शकता.
Cumin Water as Weight Loss Drink: वाढत्या वजनामुळे लोक चांगलेच हैराण झाले आहेत. आजकालच्या लाइफस्टाईलमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांचं वजन वेगाने वाढत आहे. एकदा तर पोटावर आणि कंबरेवर चरबी वाढली तर ती कमी करणं काही सोपं काम नाही. पण काही उपाय असे असतात ज्यामुळे तुम्ही ही वाढलेली चरबी कमी करू शकता. पण त्यात नियमितता हवी. एक असं खास ड्रिंक आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. हे पेय तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने तयार करू शकता.
पोट कमी करण्यासाठी काय करावं?
बेली फॅट कमी करणं काही खायचं काम नाही. पण तुमच्या घरात जिरं असेल तर तुम्ही ही समस्या बरीच कमी करू शकता. डाइटीशियन डॉ. आयुषी यादव (Dr. Ayushi Yadav) यांनी सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिऱ्याचं पाणी पिऊ शकता. याने शरीरातील चरबी कमी केली जाऊ शकते.
जिरं एक असा मसाला आहे ज्याचा वापर भारतात वेगवेगळ्या रेसेपिजमध्ये केला जातो. याचं सेवन केल्याने वजन तर कमी होतंच, सोबतच डायजेशनही चांगलं राहतं. तसेच पोटासंबंधी अनेक समस्याही दूर होतात. जिऱ्याचं पाणी पिणं यासाठी फायदेशीर असतं कारण यात कॅलरी कमी असतात. सोबतच याने चरबी कमी करण्यास मदत मिळते. जिऱ्याच्या पाण्यात आयरन भरपूर असतं. ज्यामुळे शरीरावरील सूजही कमी होते.
कसं तयार कराल हे खास पाणी?
जिऱ्याचं हे खास ड्रिंक तयार करण्यासाठी 2 चमचे जिरं घ्या आणि ते एक ग्लास पाण्यात टाकून रातभर भिजू घाला. सकाळी हे पाणी उकडून घ्या आणि थंड करून सुती कपड्यातून गाळून घ्या. नंतर या पाण्यात थोडा लिंबाचा रस घाला आणि हे पाणी प्या. जर तुम्ही 2 ते 3 आठवडे हे पाणी नियमित प्याल तर तुम्हाला फरक जाणवेल.
जर जिऱ्याचं हे खास पाणी सहजपणे तयार करायचं असेल तर जिऱ्याचं पावडर तयार करा. एक कप पाण्यात एक चमचा जिरं पावडर टाकून उकडून तुम्ही पिऊ शकता.