'या' झाडाच्या मुळांमध्ये दडलंय तुमच्या आरोग्याचं रहस्य, रक्तवाहिन्यांच्या विकासासाठी रामबाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 04:30 PM2022-04-21T16:30:35+5:302022-04-21T16:32:51+5:30
हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन नावाचे संयुग कृत्रिम रक्तवाहिन्या (Artificial blood vessels) आणि ऊतकांच्या (tissues) विकासासाठी फायदेशीर आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ACS Applied Materials and Interfaces या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
हळदीच्या औषधी गुणधर्मांबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. आता कॅलिफोर्निया विद्यापीठ, रिव्हरसाइडच्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असं सांगण्यात आलं आहे की, हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन नावाचे संयुग कृत्रिम रक्तवाहिन्या (Artificial blood vessels) आणि ऊतकांच्या (tissues) विकासासाठी फायदेशीर आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ACS Applied Materials and Interfaces या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
UC रिव्हरसाइड बायोइंजिनियर लवकरच प्रयोगशाळेत रक्तवाहिन्या आणि इतर ऊती विकसित करतील, असे या अभ्यासावरून दिसत आहे. ज्याचा उपयोग मानवांमध्ये खराब झालेली ऊतके पुन्हा नीट करण्यासाठी किंवा नवीन निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे कर्करोगाच्या ट्यूमरमध्ये एंजियोजेनेसिस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
परंतु, कर्क्यूमिन-कोटेड नॅनोपार्टिकल्सयुक्त मॅग्नेटिक हाइड्रोजेल वस्कुलर एंडोथेलियलच्या वाढीस प्रोत्साहन देणारे स्राव वाढवतात. वास्तविक, वस्कुलर रिजेनरेशन मध्ये करक्यूमिन वापरण्याची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती, परंतु त्याबद्दल कोणताही ठोस अभ्यास झाला नव्हता.
यूसीआरच्या मार्लन आणि रोझमेरी बोर्न्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील बायोइंजिनियरिंगचे प्राध्यापक हुयानन लिऊ यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने कर्क्यूमिनच्या रिजनेरेटिव गुणधर्मांचा अभ्यास केला. कॅलिफोर्निया रिव्हरसाइड विद्यापीठातील या संशोधनासाठी प्रोफेसर लिऊ यांना त्यांचे विद्यार्थी राधा दया, चांगलू झू, न्हू-वाई आणि थि गुयेन यांनी सहकार्य केलं.
स्टडी कशी झाली?
कंपाऊंडवर मॅग्नेटिक आयर्न ऑक्साईडचा थर तयार करून जैविक हायड्रोजेलशी सुसंगत बनवले. संशोधकांनी हे देखील तपासले आहे की, नॅनोपार्टिकल मॅग्नेटिझमचा वापर नॅनोकणांना शरीरात आवश्यक ठिकाणी निर्देशित करण्यासाठी केला जाऊ शकतो.
या अभ्यासात त्यांनी ताज्या डुकराच्या ऊतीमागे नळीद्वारे कर्क्यूमिन-कोटेड नॅनोकण सोडले आणि चुंबकाद्वारे त्यांची हालचाल यशस्वीरित्या निर्देशित केली. या प्रयोगामुळे ही पद्धत खराब झालेल्या ऊतींवर उपचार करण्यासाठी किंवा तेथून त्या ऊतीं बदलण्यासाठी वापरली जाऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे.