सकाळी रिकाम्या पोटी दही खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 11:49 AM2024-06-26T11:49:26+5:302024-06-26T11:50:38+5:30

Curd Eating Tips : काही लोक याला योग्य मानतात तर काही लोक अयोग्य. अशात आज आपण हे जाणून घेणार आहोत की, सकाळी रिकाम्या पोटी दही खाता येऊ शकतं का.

Curd eating in empty stomach is good or bad for health? | सकाळी रिकाम्या पोटी दही खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी दही खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Curd Eating Tips : उन्हाळ्यात लोक थंड पदार्थ जास्त खातात. ज्यामुळे पोट थंड राहतं. पण सकाळी रिकाम्या पोटी दही खावं की नाही याबाबत काही लोकांना प्रश्न पडतो. काही लोक याला योग्य मानतात तर काही लोक अयोग्य. अशात आज आपण हे जाणून घेणार आहोत की, सकाळी रिकाम्या पोटी दही खाता येऊ शकतं का.

रिकाम्या पोटी दही खायचं का?

उन्हाळ्यात दही पोटासाठी एक वरदान ठरतं. काही लोक सकाळी नाश्त्या किंवा त्यापासून तयार पदार्थ खाणं पसंत करतता. पण सकाळी रिकाम्या पोटी दही खाणं योग्य आहे का? दह्याबाबत एक चांगली बाब म्हणजे तुम्ही ते वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता. ओट्स, चीया सिड्स, भात, फ्रूट्स अनेक गोष्टींसोबत दही खाऊ शकता.

दह्याची लस्सी बनवून पिऊ शकता. कोशिंबिरमधून खाऊ शकता. जेव्हा तुम्ही दही सकाळी रिकाम्या पोटी खाता तेव्हा याचे फायदे डबल होतात. हे फायदे काय आहेत जे जाणून घेऊ.

दह्यात भरपूर प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांसाठी खूप फायदेशीर असतात. सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. सकाळी नाश्त्यात दही खाल्ल्याने पोटासंबंधी समस्याही दूर होतात.

इम्यूनिटी बूस्ट होते

रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. दह्यात व्हिटॅमिन सी असतं. याने इम्यूनिटी मजबूत होते आणि अनेक इन्फेक्शन किंवा आजारांपासून बचाव होतो.

पोट आणि पचनासाठी चांगलं

सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने पचन चांगलं होतं. दह्यात व्हिटॅमिन बी १२ असतं, सोबतच यात लॅक्टोबेसिल्स बॅक्टेरिया असतात जे आरोग्यासाठी फार चांगले असतात. यामुळे पोटात हेल्दी बॅक्टेरिया वाढतात. सोबतच पचन तंत्रही चांगलं राहतं.

वजन कमी करण्यास मिळते मदत

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी रिकाम्या पोटी दही खावं. दही खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. दह्यातील तत्वामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन कंट्रोलमध्ये राहतात. ज्यामुळे मेटाबॉलिज्म चांगलं राहतं.

हाडे होतात मजबूत

सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे शरीरात कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि प्रोटीन मिळतं. हे पोषक तत्व हाडांचं आरोग्य चांगलं ठेवतात. 

कुणी खाऊ नये रिकाम्या पोटी दही

अस्थमाच्या रूग्णांनी रिकाम्या पोटी किंवा कोणत्याही पद्धतीने खाऊ नये. कारण यातील आंबटपणामुळे कफ तयार होतो. अस्थमा असेल आणि दही खाल्लं तर छातीत कफ जमा होतो.

ज्या लोकांना गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आहे त्यांनी रिकाम्या पोटी दही अजिबात खाऊ नये. सोबतच ज्यांचं पचन तंत्र खराब आहे त्यांनीही दही खाणं टाळलं पाहिजे. खासकरून रात्री दही अजिबात खाऊ नये. अशा लोकांनी उडीद डाळीसोबत दही खाऊ नये. 

Web Title: Curd eating in empty stomach is good or bad for health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.