पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दह्याचा खास फंडा, एकदा कराल तर फायद्यात रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 12:39 PM2023-06-17T12:39:45+5:302023-06-17T12:42:05+5:30

Curd for weight Loss : गूळ आणि दही सोबत खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. या कॉम्बिनेशनने शरीरात आयरनची कमतरता भरून काढतं.

Curd is very helpful for loose weight, know the way | पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दह्याचा खास फंडा, एकदा कराल तर फायद्यात रहाल!

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दह्याचा खास फंडा, एकदा कराल तर फायद्यात रहाल!

googlenewsNext

Curd for weight Loss :  कोणत्याही महत्वाच्या कार्यासाठी घरातून बाहेर निघताना घरातील आजी किंवा आई दही आणि साखर नक्की खाऊ घालतात. याने कामात यश मिळतं अशी मान्यता आहे. पण जर दह्यासोबत गूळ मिक्स करून खाल्ला तर गुडलकसोबतच आरोग्यही चांगलं राहतं. गूळ आणि दही सोबत खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. या कॉम्बिनेशनने शरीरात आयरनची कमतरता भरून काढतं. सोबतच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. चला जाणून घेऊ याचे फायदे....

इम्यूनिटी वाढते

हिवाळ्यात हे कॉम्बिनेशन अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरतं. गूळ गरम असतो ज्यामुळे सर्दी-खोकलासारखे संक्रमण कमी त्रास देतात. त्यासोबतच दह्याचे फायदेही शरीराला मिळतात. दह्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढते.

बेली फॅट का आहे घातक?

कंबरेच्या आजूबाजूला चरबी होण्याला बेली फॅट म्हटलं जातं. डॉक्टर्सही सांगतात की, पोटावर चरबी वाढल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. स्ट्रोक आणि हृदय रोगाचा धोकाही अधिक असतो. त्यासोबतच पोटावर चरबी वाढल्याने शरीरात अनेक बदलही होतात. जसे की, मेटाबॉलिक रेट कमी होतो. कोर्टिसोल हार्मोनची निर्मिती वाढते. आणि हे कोर्टिसोल हार्मोन स्ट्रेस वाढवण्याचं काम करतात.

तसेच पोटावर चरबी अधिक असल्याने सायटोकिनचं प्रमाणही वाढतं, ज्याने शरीरातील इन्फ्लेमेटरीचं प्रमाण वाढतं. यामुळेच शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि डायबिटीसचा धोका अनेक पटीने वाढतो. म्हणजे सर्व गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत.

कोणत्या आजारांचा धोका?

पोट आणि कंबरेवर चरबी वाढल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो. त्यात प्रामुख्याने हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉलची समस्या, हार्ट स्ट्रोक, डिमेंशिया, किडनीची समस्या आणि कॅन्सरचाही धोका वाढतो.

दही खाण्याचे फायदे

दही हे एक प्रोबायोटिक आहे. आतड्यांमध्ये हेल्दी बॅक्टेरिया वाढवण्यासाठी दह्याचं सेवन फायदेशीर ठरतं. त्यामुळेच दह्याचं सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि पचनक्रियाही सुधारते. असं असलं तरी दह्यात फॅटचं प्रमाण कमी असलं पाहिजे, याची काळजी घ्यावी.

Web Title: Curd is very helpful for loose weight, know the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.