दही की ताक?, आरोग्यासाठी सर्वाधिक गुणकारी काय?; आयुर्वेदानं दूर केल्यात सगळ्या शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 06:29 PM2023-12-27T18:29:01+5:302023-12-27T18:29:25+5:30
खरे तर दही आणि ताक हे आपल्या पारंपरिक आहाराचा भाग आहे. यामुळे खाल्लेले अन्न पचण्यासही मदत होते आणि आरोग्याच्या दृष्टीने यांचे मोठे फायदेही आहेत. तर जाणून घेऊयात आपल्यासाठी काय आहे अधिक आरोग्यदायी? दही की ताक?
दुग्धजन्य अथवा डेअरी प्रोडक्ट्समध्ये दही आणि ताक यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. दुधापासून तयार केलेले दह्यात मोठ्या प्रमाणावर प्रथिने, प्रोबायोटिक्स आणि आवश्यक पोषक तत्वे असतात. तसेच, दह्याला घुसळून ताक तयार केले जाते. ताकालाही आयुर्वेदात एक विशेष महत्व आहे.
खरे तर दही आणि ताक हे आपल्या पारंपरिक आहाराचा भाग आहे. यामुळे खाल्लेले अन्न पचण्यासही मदत होते आणि आरोग्याच्या दृष्टीने यांचे मोठे फायदेही आहेत. तर जाणून घेऊयात आपल्यासाठी काय आहे अधिक आरोग्यदायी? दही की ताक?
दही -
दुधापासून दही बनविण्याच्या प्रक्रियेत उपयोगी बॅक्टेरियामुळे लॅक्टोज अर्थात दुधातील साखरेचे लॅक्टिक अॅसीडमध्ये रुपांतर होते. यामुळे दह्याला आंबट चव येते आणि ते विशेष बनते.
दह्याचे आरोग्यदायी फायदे -
दही हा probiotics अर्थात प्रतिजैविकाचा अथवा उपयुक्त बॅक्टेरियाचा एक उत्तम सोर्स आहे. यामुळे पचन क्रिया चांगली राहण्यास मदत होते आणि पोषक तत्वेही मिळतात. महत्वाचे म्हणजे दह्यात उच्च प्रतिचे प्रोटीन्स देखील प्रमाणावर असतात. जे स्नायू आणि एकूणच शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. याशिवाय, दह्यात लक्षणीय प्रमाणात कॅल्शियमही असते. ज्यामुले आपली हाडे आणि दात मजबूत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
रोगप्रतिकार शक्ती वाढते -
दह्यामध्ये प्रतिजैविके (Probiotics) असतात जे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळे आपल्या शरीराचे संसर्गापासून संरक्षण होते आणि पचन क्रियाही सुधारते.
ताक आणि त्याचे आरोग्यदायी फायदे -
ताकामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, ज्यामुळे पचन क्रिया चांगली राहते अर्थात ते पचनाला मदत करते आणि पोट चांगले ठेवते. महत्वाचे म्हणजे, अनेकवेळा अपचासारखी समस्या अथवा अॅसिडिटी दूर ठेवण्यासाठीही हे घेतले जाते. दह्या प्रमाणेच ताकातही प्रोबायोटिक्स असतात. जे निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे पचन क्रिया चांगली होण्याबरोबरच रोगप्रतिकार शक्तीही वाढते.
पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत अन् फॅट्स देखील कमी -
महत्वाचे म्हणजे ताक हा अनेक आवश्यक पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहे. यात कॅल्शियम, व्हिटॅमीन B12, रिबोफ्लेविन आणि फॉस्फरसचा समावेश होतो. याशिवाय दुधाच्या तुलनेत ताकामध्ये फॅट्सचे प्रमाणही कमी असते. ताक हे एक हायड्रेटिंग पेयही आहे. विशेष म्हणजे, ताकामध्ये चांगल्या प्रमाणावर कॅल्शियम आणि फॉस्फोरस असते. जे हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासठी मदत करते.
दही की ताक? आरोग्यासाठी सर्वाधिक गुणकारी काय? -
दही आणि ताकाचा विचार करता, ताक हा दह्याला एक उत्तम आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला पर्याय असल्याचे आयुर्वेदाने म्हटले आहे. तसेच, ताकासोबत जिरे पावडर, मीठ आणि कोथिंबीर यांसारख्या मसाल्यांचा वापर केल्याने ताकाचा केवळ स्वादच वाढत नाही, तर त्याचे आरोग्य फायदे देखील वाढवतात.