दहृयात साखर टाकावी की मीठ? आरोग्यास काय अधिक फायदेशीर? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 01:16 PM2021-08-15T13:16:52+5:302021-08-15T13:17:55+5:30

भारतीय परंपरेनुसार आपण एखाद्या महत्वाच्या कामाला, मीटिंगसाठी, परीक्षेसाठी बाहेर जातो त्यावेळी दही साखर देण्याची पद्धत आहे. पण दह्यात साखर घालावी की मीठ? तुम्हाला काय वाटते...

curd with sugar on curd with salt, which is best for health? know the truth | दहृयात साखर टाकावी की मीठ? आरोग्यास काय अधिक फायदेशीर? घ्या जाणून

दहृयात साखर टाकावी की मीठ? आरोग्यास काय अधिक फायदेशीर? घ्या जाणून

googlenewsNext

आयुर्वेदानुसार दुधापासून बनवलेलं दही हे त्याचा पोषकतत्वामुळे सर्वोत्कृष्ट मानले जाते. दही हे पचण्यास कमी वेळ लागतो. दही हे नैसर्गिकरित्या उष्ण आहे. उन्हाळ्यात किंवा शारीरिक मेहनत केल्यावर आपल्या शरीरातील मिनरल्स आणि पाणी कमी होते व शरीराला थकवा जाणवतो, तहान लागते. अशा वेळी दही साखर घेतल्यास हे संयोजन मेंदूला शर्करा पुरवण्याचे काम करते आणि आपली ऊर्जापातळी लगेच वाढते.

भारतीय परंपरेनुसार आपण एखाद्या महत्वाच्या कामाला, मीटिंगसाठी, परीक्षेसाठी बाहेर जातो त्यावेळी दही साखर देण्याची पद्धत आहे. कारण त्यामुळे शरीर शांत आणि तणावमुक्त होते. जेव्हा आपण रिलॅक्स होतो तेव्हा आपण आपले काम जास्त एकाग्रतेने करू शकतो. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी दही साखरेबरोबर खाणे खूप उपयुक्त आहे. दही आणि साखर हे संयोजन तहान भागवण्यासाठी उत्तम आहे.

जेव्हा आपण दह्यात मीठ घालतो तेव्हा त्यातील गुड बॅक्टरीया वर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे दह्यातील प्रोबायोटिक हा प्रमुख घटक निघून जातो आणि त्याचा आपल्या शरीराला कोणताच फायदा होत नाही. परंतु आपण किती मीठ घालतो यावर अवलंबून आहे. किंचित मीठ घातले तर त्याचा फार दुष्परीणाम होणार नाही आणि दह्याची चव नक्की वाढेल.

Web Title: curd with sugar on curd with salt, which is best for health? know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.