कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी 'असं' करा दह्याचं सेवन, लगेच दूर होईल समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 11:28 AM2024-07-15T11:28:22+5:302024-07-15T11:36:33+5:30
हाय कोलेस्टेरॉल असल्यावर दही खाल्ल्याने इतरही अनेक फायदे मिळतात. पण दही कधी आणि कसं खावं हेही जाणून घेतलं पाहिजे.
How To Cholesterol : हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्या होण्यासाठी कोलेस्टेरॉल जबाबदार असतो. कोलेस्टेरॉल वाढलं तर शरीरातील रक्त वाहिन्या ब्लॉक होतात ज्यामुळे पुढे हार्ट अटॅक येतो. अशात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात. सोबतच ब्लड प्रेशरही वाढतं. तुमचं जर कोलेस्टेरॉल वाढलं असेल आणि तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही दह्याने ते कमी करू शकता. दह्याच्या मदतीने कोलेस्टेरॉल कमी होऊ शकतं आणि ब्लड प्रेशरचा धोका कमी करतं. हाय कोलेस्टेरॉल असल्यावर दही खाल्ल्याने इतरही अनेक फायदे मिळतात. पण दही कधी आणि कसं खावं हेही जाणून घेतलं पाहिजे.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दही कसं खावं?
हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दही खायचं असेल तर ४ चमचे सब्जा थोड्या पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर त्यात दही मिक्स करा आणि मग त्याचं सेवन करा. असं केल्याने शरीरात फायबर वाढतं आणि रक्तवाहिन्या साफ होण्यास मदत मिळते. सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिडचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे शरीरात फॅट मेटाबॉलिज्म उत्तेजित होतं. रोज सकाळी रिकाम्या पोटी दही आणि सब्जा खाल्ल्याने तुम्हाला मोठा फायदा मिळतो.
हाय कोलेस्टेरॉल असल्यावर दही आणि सब्जा सोबत खाल्ल्याने तुम्हाला खूप फायदा मिळतो. यात हाय फायबर असल्याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात आणि शरीर आतून थंड राहतं. तसेच शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघतात. इतकंच नाही तर याने शरीरासाठी आवश्यक गुड cholesterol ही शरीरात वाढतं. दह्यातील व्हिटॅमिन सी एका स्क्रबरसारखं काम करतं. जे धमण्यांमध्ये जाऊन कोलेस्टेरॉल कमी करतं.