दह्यात मीठ टाकून खाणं योग्य की साखर?, जाणून घ्या कशाने मिळतो जास्त फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 10:58 AM2024-07-22T10:58:20+5:302024-07-22T10:59:59+5:30
Curd with Sugar vs Curd with Salt: आवडीच्या नादात अनेकदा आरोग्याचं नुकसान होतं. अशात आज आपण जाणून घेणार आहोत की, दह्या साखर टाकून खाणं योग्य की मीठ टाकून खाणं योग्य. जास्त फायदेशीर काय आहे.
Curd with Sugar vs Curd with Salt: जास्तीत जास्त लोकांना दही खाणं आवडतं. पण अनेकांना दही खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. अनेकांना असाही प्रश्न पडतो की, दही साखरेसोबत खावं की मीठ टाकून खावं? प्रत्येकाची आवड वेगळी असते. पण आवडीच्या नादात अनेकदा आरोग्याचं नुकसान होतं. अशात आज आपण जाणून घेणार आहोत की, दह्या साखर टाकून खाणं योग्य की मीठ टाकून खाणं योग्य. जास्त फायदेशीर काय आहे.
दह्यासोबत मीठ
जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही दह्यासोबत साखर अजिबात खाऊ नका. असात मिठच जास्त चांगला पर्याय ठरतं. पण दह्यासोबत मीठ खाणं हाय ब्लड प्रेशरची समस्या असणाऱ्या लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्याशिवाय मिठामध्ये अनेक अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जर मीठ दह्यात टाकलं तर दह्यातील गुड बॅक्टेरिया नष्ट होतात. सोबतच मीठ घातलेल्या दह्याचं जास्त सेवन केल्याने हायपरटेंशनची समस्या वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे या दोन गोष्टी एकत्र करणं नुकसानकारक ठरतं.
साखर आणि दही
दह्यात साखर टाकून खाणं पचन तंत्राच्या दृष्टीने चांगलं असतं. याने दह्यातील गुड बॅक्टेरिया नष्ट होत नाही. याने पोटातील जळजळही शांत होते. पण दह्यात साखर टाकून खाल्ल्याने वजन वेगाने वाढतं. कारण यात कॅलरी जास्त असतात. तसेच डायबिटीसच्या रूग्णांसाठीही हे कॉम्बिनेशन योग्य नाही. अशात साखर असो वा मीठ दोघांचे आपापले फायदे आणि नुकसान आहेत. त्यामुळे यांचं सेवन करताना काळजी घेणं महत्वाचं आाहे.
कसं करावं दह्याचं सेवन?
दह्या थोड्या प्रमाणात मीठ किंवा साखर मिक्स करून फार काही नुकसान होत नाही. पण जर तुम्हाला डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा लठ्ठपणाची समस्या असेल तर याचं सेवन टाळावं किंवा कमी करावं. एक्सपर्ट सांगतात की, दही मीठ आणि साखरेशिवाय खाणं सगळ्यात चांगला पर्याय आहे.