काळ्याभोर केसांसाठी वरदान आहे कढीपत्ता ; असा करा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 04:38 PM2019-03-15T16:38:42+5:302019-03-15T16:41:43+5:30

रोजच्या स्वयंपाकात फोडणीमध्ये  वापरण्यात येणारा कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम असल्याचे अनेकदा सांगितले जाते. चला तर बघूया कसा वापरायचा हा कढीपत्ता 

Curry leaves are a boon for black hair | काळ्याभोर केसांसाठी वरदान आहे कढीपत्ता ; असा करा वापर !

काळ्याभोर केसांसाठी वरदान आहे कढीपत्ता ; असा करा वापर !

googlenewsNext

पुणे : काळेभोर, लांबसडक केस सगळ्यांना हवेहवेसे असतात. पण सध्या वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस केसांच्या वाढीत अनेक अडचणी येत आहेत. रुक्ष, गळणारे केस आणि त्याला फुटणारे फाटे यामुळे केस वाढवायलाही भीती वाटत असल्याचे मत अनेकदा व्यक्त केले जाते. मात्र प्रत्येकवेळी यासाठी गोळ्या किंवा औषधे घेण्यापेक्षा घरगुती उपायांनीही फरक पडल्याचे दिसून येते. रोजच्या स्वयंपाकात फोडणीमध्ये  वापरण्यात येणारा कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम असल्याचे अनेकदा सांगितले जाते. चला तर बघूया कसा वापरायचा हा कढीपत्ता 

असा उपयोगी आहे कढीपत्ता :

कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी१, बी३, बी९ आणि सी असतात. याशिवाय आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस आढळतं. याचं दररोज सेवन केल्यानं आपले केस काळे, लांबसडक होतात आणि कोंड्याची समस्याही दूर होते. 

कढीपत्त्याची पावडर :

कढीपत्ता वाळवून त्या पानांना मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. साधारण २०० मिली  तेलात  ५ चमचे कढीपत्त्याचं पावडर मिक्स करून उकळून घ्यावं. हे मिश्रण थंड झाल्यावर हवाबंद बाटलीत भरून ठेवावे. शाम्पू करण्यापूर्वी रात्री हे तेल केसांना लावून ठेवा.सकाळी शक्यतो नैसर्गिक शाम्पूने केस धुवून टाका. 

कढीपत्त्याचा मास्क :

कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनीटं तसेच ठेवा, नंतर शॅम्पूनं केस धुवा. असं नेहमी केल्यानं केस काळे आणि घनदाट होतात.

कढीपत्ता चहा :

कढीपत्ता पाण्यात उकळून घ्या. यात लिंबू पिळा आणि साखर घाला. साखरेऐवजी गूळही वापरू शकता. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवतो. 

Web Title: Curry leaves are a boon for black hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.