Curry Leaves: सकाळी झोपेतून उठल्यावर आवर्जून खा कढीपत्त्याची पाने, जवळही येणार नाही या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 10:01 AM2023-03-07T10:01:25+5:302023-03-07T10:03:32+5:30

Curry Patta Fayde: कढीपत्त्यांच्या मदतीने पदार्थाला आणखी चांगली टेस्ट मिळते. अनेक लोक कढीपत्ता बाजारातून विकत आणतात तर काही घरीच याचं झाड लावतात.

Curry leaves health benefits while chewing in the morning while waking up | Curry Leaves: सकाळी झोपेतून उठल्यावर आवर्जून खा कढीपत्त्याची पाने, जवळही येणार नाही या समस्या

Curry Leaves: सकाळी झोपेतून उठल्यावर आवर्जून खा कढीपत्त्याची पाने, जवळही येणार नाही या समस्या

googlenewsNext

Curry Patta Fayde: भारतीय किचनमध्ये कडीपत्त्याचा भरपूर वापर केला जातो. खासकरून साऊथ इंडियन डिशेसमध्ये याचा जास्त वापर केला जातो. कढीपत्त्यांच्या मदतीने पदार्थाला आणखी चांगली टेस्ट मिळते. अनेक लोक कढीपत्ता बाजारातून विकत आणतात तर काही घरीच याचं झाड लावतात.

आरोग्याचा खजिना आहे ही पाने

कढीपत्त्यांमध्ये फॉस्फोरस, कॅल्शियम, आयरन, कॉपर, विटामिन आणि मॅग्नेशियमसारखे न्यूट्रिएंट्स आढळतात. जे शरीराला वेगवेगळे फायदे देण्याचं काम करतात. चला जाणून घेऊ सकाळ जर 3 ते 4 पाने खाल्ली तर तुम्हाला याचा काय फायदा होतो.

1) डोळ्यांसाठी फायदेशीर

कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने नाइट ब्लाइंडनेस किंवा डोळ्यांशी संबंधित इतर आजारांचा धोकाही टाळला जाऊ शकतो. कारण यात डोळ्यांसाठी आवश्यक व्हिटॅमिन ए असतं. याने डोळ्यांची दृष्टी अधिक वाढते.

2) डायबिटीसमध्ये फायदेशीर

डायबिटीसमध्ये अनेकदा रूग्णांना ही पाने चावण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात हाइपोग्लायसेमिक तत्व आढळतात. जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतात.

3) डायजेशन होतं चांगलं 

ही पाने रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने डायजेशन चांगलं होतं. सोबतच बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगसहीत पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात.

4) इंफेक्शनपासून बचाव

कढीपत्त्यामध्ये अ‍ॅंटीफंगल आणि अ‍ॅंटी-बायोटीक गुण आढळतात. ज्याने अनेक प्रकारच्या इंफेक्शनपासून बचाव होतो. याने अनेक आजारांचा धोका टाळला जातो.

5) वजन होईल कमी

ही पाने खाल्ल्याने वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते. कारण यात एथिल एसीटेट महानिम्बाइन आणि डाइक्लोरोमेथेन सारखे तत्व आढळतात.

Web Title: Curry leaves health benefits while chewing in the morning while waking up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.