सावधान! नाकातील केस काढल्याने होऊ शकतो जीवाला धोका, डॉक्टरांनी सांगितलं त्यांचं महत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 03:55 PM2021-08-30T15:55:53+5:302021-08-30T15:59:00+5:30

ब्रिटिश डॉक्टर करण राजन यांनी सोशल मीडियावरून लोकांना याबाबत आवाहन केलं की, त्यांनी नाकातील केस काढू नये.

Cutting nose hair can kill life the doctor told that these hairs are necessary | सावधान! नाकातील केस काढल्याने होऊ शकतो जीवाला धोका, डॉक्टरांनी सांगितलं त्यांचं महत्व

सावधान! नाकातील केस काढल्याने होऊ शकतो जीवाला धोका, डॉक्टरांनी सांगितलं त्यांचं महत्व

googlenewsNext

तुम्ही नेहमीच लोकांना बॉडी ग्रूमिंगच्या नावावर अनेक प्रयोग करताना पाहिलं असेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, काही प्रयोग जीवावरही बेतू शकतात. अशीच एक ग्रूमिंग टिप आहे नाकातून केस कापणे. नाकातील केस वॅक्स किंवा मग पुलिंगच्या किंवा कात्रीच्या माध्यमातून काढणे फार धोकादायक ठरू शकतं. एक्सपर्ट सांगतात की, ही सवय तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. ब्रिटिश डॉक्टर करण राजन यांनी सोशल मीडियावरून लोकांना याबाबत आवाहन केलं की, त्यांनी नाकातील केस काढू नये.

इन्स्टाग्रामवर या मुद्द्यावरून डॉक्टर करण राजन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे आणि पोस्टच्या माध्यमातून लोकांना सांगितलं की, ग्रूमिंग म्हणून नाकातील केस काढणं जीवघेणं ठरू शकतं. त्यांनी डायग्रामच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, नाकातील केस आपल्यासाठी किती फायदेशीर आहेत आणि ते काढणं आपल्याला किती प्रभावित करू शकतं. ब्रिटनच्या National Health Service मध्ये काम करणारे डॉक्टर करण राजनने लोकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी सुंदर दिसण्याच्या नादात जीव धोक्यात घालू नये.

नाकातील केस फायदेशीर

डॉक्टर म्हणाले की, आपल्या नाकात दोन प्रकारचे केस असतात. एक मायक्रोस्पोपिक सिलिया हेअर जे नाकाच्या आतील द्रव्य फिल्टर करतात आणि ते पुन्हा गळ्याकडे पाठवतात. तर मोठे पार्टिकल्स बाहेर येतात. डॉक्टर या जाड केसांना बाहेर काढण्यास मनाई करतात. डॉक्टर म्हणाले की, जर ते दिसायला चांगले दिसत नसतील तर खेचून काढण्याऐवजी कापून छोटे केले जाऊ शकतात. हे केस नाकात बॅक्टेरिया आणि जर्म्स जाण्यापासून रोखतात. जर ते काढले तर जर्म्स नाकात जाऊन इन्फेक्शन होऊ शकतं.

ब्रेन इन्फेक्शनचा धोका

पोस्टमध्ये डॉक्टरांनी डायग्रामच्या माध्यमातून दाखवलं की, नाकाच्या आत होणाऱ्या डेंजर ट्राएंगलमुळे ब्रेन इन्फेक्शन होऊ शकतं. नाकातील काही नसा नाकात रक्तप्रवाह करतात. ज्या मेंदूतील रक्ताच्या काही नसांना मिळतात. त्यात जर जर्म्स किंवा बॅक्टेरिया झाले तर यामुळे ब्रेनमद्ये इन्फेक्शन पसरू शकतं. 

डॉक्टर म्हणाले की, हे तसं लवकर होत नाही. पण आपल्या इम्यून सिस्टीमला प्रभावित करण्याची यात पूर्ण क्षमता असते. अशात नाकातील केसांना अनावश्यक समजून ते वॅक्स किंवा कोणत्याही प्रकारे खेचून काढून नका त्याऐवजी कापून कमी करा. डॉक्टरचा हा व्हिडीओ आतापर्यंत १० हजार वेळा पाहिला गेलाय आणि लोक हे मान्य करतात की, याने नुकसान होतं.
 

Web Title: Cutting nose hair can kill life the doctor told that these hairs are necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.