सायकल चालवल्याने होतो कॅन्सर आणि हृदय रोगाचा धोका कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 10:32 AM2018-10-16T10:32:47+5:302018-10-16T10:33:26+5:30

महागड्या बाईक्स आणि लक्झरी कार्स हा नेहमीच स्टेटसचा विषय ठरतो. पण हेल्थबाबत जागरूक लोकांमध्ये अलिकडे सायकल मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे.

Cycle reduces the risk of cancer and heart disease! | सायकल चालवल्याने होतो कॅन्सर आणि हृदय रोगाचा धोका कमी!

सायकल चालवल्याने होतो कॅन्सर आणि हृदय रोगाचा धोका कमी!

googlenewsNext

(Image Credit : cyclelikeagirl.com)

महागड्या बाईक्स आणि लक्झरी कार्स हा नेहमीच स्टेटसचा विषय ठरतो. पण हेल्थबाबत जागरूक लोकांमध्ये अलिकडे सायकल मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. मोठ्या संख्येने लोक फिट आणि हेल्दी राहण्यासाठी सायकल चालवत आहेत. सायकलींग एक बेस्ट एक्सरसाईज मानली जाते ज्याने शरीराच्या सर्व मांसपेशींची हालचाल होते. त्यामुळे बॉडी अॅक्टिव राहते. पण सायकल चालवण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत. 

हृदयाचे आजार होतील कमी

सायकल चालवून हृदयासंबंधी आजार दूर करण्यासोबत अवेळी येणारं मरणही टाळता येतं. शोधातून याता खुलासा झाला आहे की, सायकल चालवल्याने हृदय रोगांचा धोका ४६ टक्के कमी होतो. तेच पायी चालण्याने हृदय रोगांचा धोका २७ टक्के कमी होतो.

कमी होतो कॅन्सरचा धोका

सायकलींग केल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासूनही बचाव होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या शोधातून ही बाब समोर आली आहे की, नियमीतपणे सायकलींग केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. हा अभ्यास ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. अभ्यासकांनी सांगितले की, ऑफिसमध्ये सायकलने जाणे पायी जाण्यापेक्षा जास्त फायद्याचे आहे. नियमीतपणे सायकल चालवल्याने कॅन्सरचा धोका ४५ टक्के कमी होतो. शोधानुसार, २ लाख ६४ हजार ३७७ लोकांवर हा अभ्यास केला गेला. 

वेगाने बर्न होतात कॅलरी

शोधानुसार, वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईजच्या माध्यमातून तुम्हाला आठवड्यातून कमीत कमी २ हजार कॅलरी बर्न कराव्या लागतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, नियमीतपणे तुम्ही सायकल चालवली जक तुम्ही प्रत्येक तासाला ३०० कॅलरी बर्न होतात. अशात तुम्ही जितकी जास्त सायकल चालवाल तितक्या जास्त कॅलरी बर्न करता येतील. 

बेली फॅट होणार कमी

हेल्थ एक्सपर्टनुसार, सायकल चालवल्याने केवळ हार्ट रेट वाढतो असे नाही तर कॅलरीही बर्न होतात. नियमीत सायकल चालवल्याने शरीरातील सर्वच भागातील फॅट कमी व्हायला सुरुवात होते. यात बेली फॅटचाही समावेश आहे. 
 

Web Title: Cycle reduces the risk of cancer and heart disease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.