पायी चालणं अन् सायकलिंगमुळे मुलांमधला लठ्ठपणाचा धोका होतो कमी - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 08:14 PM2019-05-21T20:14:32+5:302019-05-21T20:15:46+5:30

काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, जी मुलं सायकलिंग करतात आणि खूप पायी चालतात त्यांच्यामध्ये लठ्ठपणाचा धोका फार कमी असतो.

Cycling or walking reduces the risk of obesity in children says a study | पायी चालणं अन् सायकलिंगमुळे मुलांमधला लठ्ठपणाचा धोका होतो कमी - रिसर्च

पायी चालणं अन् सायकलिंगमुळे मुलांमधला लठ्ठपणाचा धोका होतो कमी - रिसर्च

Next

(Image Credit : Momentum Mag)

काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, जी मुलं सायकलिंग करतात आणि खूप पायी चालतात त्यांच्यामध्ये लठ्ठपणाचा धोका फार कमी असतो. म्हणजेच, जर तुमची मुलं सायकल चालवत असेल आणि वॉकसाठीही जात असेल तर त्याला लठ्ठपणाचा धोका कमी असतो. या संशोधनानुसार, जी मुलं पायी किंवा सायकलने शाळेत जातात, त्यांना कार किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने शाळेत जाणाऱ्या मुलांच्या तुलनेत लठ्ठपणाचा धोका कमी असतो. 

(Image Credit : The Bub Hub)

बीएमसी पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनामध्ये संशोधकांनी प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये वजन आणि लठ्ठपणाच्या स्तरावर एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हीटिजच्या प्रभावाचं आकलन करण्यात आलं आहे. या अॅक्टिव्हिटीजमध्ये मुलांचं दररोज शाळेमध्ये येणं आणि खेळांमध्ये सहभागी होणं यांचा अभ्यास करण्यात आला होता. 

संशोधकांना असं आढळून आलं की, मुलांमधील लठ्ठपणाचा स्तर मोजण्यासाठी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) तुलनेत फिजिकल अॅक्टिव्हिटी जास्त परिणामकारक होती. कारण यामध्ये संपूर्ण वजनाचं आकलन करण्यात येतं. 

(Image Credit : vichealth.vic.gov.au)

संशोधनामध्ये प्राथमिक शाळेतील 2 हजार मुलांना सहभागी करण्यात आले होते. लठ्ठपणाची रिस्क चेक करण्यासाठी संशोधकांकडून बीएमआयचाही वापर करण्यात आला होता. यामध्ये थक्क करणारे आकडे समोर आले होते. संशोधकांना असं आढळून आलं की, जी मुलं दररोज खेळांमध्ये सहभागी झाली होती. त्यांच्या तुलनेत जी मुलं फक्त आठवड्यातून एकदाच सहभागी झाली होती त्यांच वजन कमी होतं. 

संशोधक बोश यांच्या सांगण्यानुसार, 'दररोज खेळांमध्ये भाग घेणाऱ्या आणि लठ्ठपणाच्या स्तराच्या कनेक्शनमध्ये मागील संशोधनामध्ये अस्थिरता दिसून आली होती. परंतु यापैकी अनेक संशोधनं बीएमआयला आपला आधार बनवत आहेत. दरम्यान जेव्हा आम्ही फक्त बॉडी फॅट्सवरच फोकस केला, तेव्हा आम्ही नोटीस केलं की, जी मुलं अॅक्टिव्ह नव्हती त्यांच्यामध्ये सर्वात जास्त लठ्ठपणा दिसून आला आणि वजनही जास्त दिसून आलं. 

संशोधकांनी असं सांगितलं की, वॉकिंग करणं किंवा सायकलवरून शाळेत जाण्यामुळे लहनपणीचं सामना करावा लागणाऱ्या लठ्ठपणापासून बचाव करणं सोप आहे. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. 

Web Title: Cycling or walking reduces the risk of obesity in children says a study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.