शरीराला दररोज किती कॅलरीजची गरज?; जास्त झाल्यास कोणत्या समस्या उद्भवतात जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:38 PM2024-07-30T17:38:29+5:302024-07-30T17:48:18+5:30

आपल्याला दररोज किती कॅलरीज आवश्यक आहेत आणि जास्त कॅलरीज घेतल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेऊया.

daily calorie needs for your body and effects of overconsumption | शरीराला दररोज किती कॅलरीजची गरज?; जास्त झाल्यास कोणत्या समस्या उद्भवतात जाणून घ्या...

शरीराला दररोज किती कॅलरीजची गरज?; जास्त झाल्यास कोणत्या समस्या उद्भवतात जाणून घ्या...

आपल्या शरीराला दररोज विशिष्ट प्रमाणात कॅलरीजची आवश्यकता असते. हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीचं वय, लिंग, वजन आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असतं. पण जर आपण आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी घेत असाल तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आपल्याला दररोज किती कॅलरीज आवश्यक आहेत आणि जास्त कॅलरीज घेतल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेऊया.

दररोज किती कॅलरीज आवश्यक?

महिला

कमी सक्रिय - १८००-२००० कॅलरीज
मध्यम सक्रिय  - २०००-२२०० कॅलरीज
खूप सक्रिय - २२००-२४०० कॅलरीज

पुरुष

कमी सक्रिय - २०००-२४०० कॅलरीज
सरासरी सक्रिय - २४००-२६०० कॅलरीज
खूप सक्रिय - २६००-३००० कॅलरीज

मुलं

मुलांचं वय आणि त्यांच्या एक्टिव्हिटीवर त्यांना नेमक्या किती कॅलरीजची गरज आहे हे अवलंबून आहे. साधारणपणे १०००-३२०० कॅलरीज आवश्यक असते.

जास्त कॅलरीज घेतल्यास काय होतं?

वजन वाढतं - जास्त कॅलरीज घेतल्याने तुमचं वजन वाढू शकतं. शरीर अतिरिक्त कॅलरी फॅट म्हणून साठवतं, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

हृदयविकार - जास्त कॅलरीज घेतल्याने तुमच्या शरीरात फॅट जमा होतं, ज्यामुळे लठ्ठपणा आणि ब्लड प्रेशर सारख्या समस्यांचा धोका वाढतो.

मधुमेह - जास्त कॅलरीज घेतल्याने शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.

पचनाच्या समस्या - जास्त कॅलरी आणि फॅटचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

ऊर्जेचा अभाव - जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज घेत असाल तर तुम्हाला सुस्तपणा आणि थकवा जाणवू शकतो.

कॅलरीज कमी करण्यासाठी काय करावं?

संतुलित आहार घ्या - तुमच्या आहारात फळं, भाज्या, धान्यं, प्रोटीन आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. याच्या मदतीने तुम्हाला सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतील. 

शारीरिक हालचाली वाढवा- दररोज किमान ३० मिनिटं व्यायाम करा. तुम्ही चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे किंवा योगासनं करू शकता. तसेच घरातील काम, बागकाम, पायऱ्या चढणे यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

पाणी प्या - दिवसभर पुरेसे पाणी प्या. हे तुमचे मेटाबॉलिझम निरोगी राहिल आणि भूक कमी लागेल. लिंबू पाणी, नारळ पाणी, ग्रीन टी प्या.

जेवणाचं प्रमाण ठरवा - एकदाच भरपूर जेऊ नका. दिवसातून अनेक वेळा थोडं थोडं खा, यामुळे तुमचं पोट लवकर भरेल आणि तुम्ही कमी खाल.
 

Web Title: daily calorie needs for your body and effects of overconsumption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.