रोजच्या चुकीच्या सवयींमुळे 'या' गंभीर समस्यांचे होत आहात शिकार, जाणून घ्या कसे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 09:55 AM2020-04-27T09:55:02+5:302020-04-27T10:05:54+5:30
या वेदनेमुळे संपूर्ण अंगदुखीची समस्यासुद्धा उद्भवू शकते. वेळीच लक्ष न दिल्यास त्रास वाढत जाऊ शकतो .
दैनंदीन जीवन जगत असताना आरोग्याच्या अनेक लहानमोठ्या कुरुबुरी उद्भवत असतात. सायटिका एक स्थिती आहे ज्यात नसांना सूज येणं, वेदना होणं अशा समस्या निर्माण होत असतात. सायटिका या आजारात पाठदुखीची समस्या जाणवते. या वेदनेमुळे संपूर्ण अंगदुखीची समस्यासुद्धा उद्भवू शकते. वेळीच लक्ष न दिल्यास त्रास वाढत जाऊ शकतो . रोजचं जीवन जगत असताना केलेल्या चुकांमुळे असा त्रास उद्भवतो. आज आम्ही तुम्हाला या चुकांबद्दल सांगणार आहोत.
घट्ट कपडे घालणं
सध्या घट्ट कपडे घालण्याची फॅशन असल्यामुळे मुली टाईट कपडे जास्त घालतात. पण ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. याशिवाय अतिघट्ट कपड्यांमुळे शरीरातील रक्त गोठलं जाऊन संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. त्यामुळे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.
हाय हिल्सच्या चपला घालणं
तुमच्या टाचांचा संबंध पाठीशी असतो. त्यामुळे चपला किंवा बुट व्यवस्थित आरामदायी नसतील तर त्याचा परिणाम तुमच्या पाठीवर होण्याची शक्यता असते. तुम्ही ज्या चपला वापरता त्यात कंफरर्टेबल वाटत नसेल तर शरीरावर परिणाम होतो. जास्तवेळ पर्यंत शुजचा वापर केल्यामुळे तुमच्या पाठीवर ताण येऊ शकतो.
मागच्या खिशात पाकिट ठेवणं
जर तुम्हाला वॉलेट मागच्या खिशात ठेवायची सवय असेल तर ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. पिरिफोर्मिस मसल्सना बाधा पोहोचल्यामुळे पिरिफोर्मिस सिंड्रोम हा आजार होण्याची शक्यता असते. मागच्या भागात वेदना होणं, काळपटपणा येणं अशी समस्या उद्भवते. त्यामुळे मागच्या खिशात शक्यतो पाकिट ठेवणं टाळा.
जास्तवेळ बसून राहिल्यामुळे
अनेकांना सतत ७ ते ८ तास बसून काम करावं लागतं त्यामुळे मासपेशींवर दबाव येत असतो. त्यामुळे कोणतेही अवयव दुखण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे सतत तुमचं सतत बसून राहायचं काम असेल तर अदेमध्ये उठून राऊंड मारा. सतत एकाचजागी बसून राहिल्यामुळे हात-पाय सुन्न पडण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-श्वसनाच्या आजारांसह रक्ताची कमतरता दूर होण्यासाठी खडीसाखरेचं सेवन ठरेल इफेक्टीव्ह)
ताण- तणाव
जास्त टेंशन किंवा स्ट्रेस तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. जास्तवेळ ताण- तणाव घेतल्यामुळे डोकेदुखी, पाठ दुखी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकता. यात सायटिका पेनचा सुद्धा समावेश असू शकतो. त्यासाठी शक्य होईल तितकं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
( हे पण वाचा-कोरोनाच्या माहामारीत आशेचा किरण दाखवणार 'सेप्सिवॅक'? जाणून घ्या औषधाबद्दल)