तुमच्या 'या' चुकांमुळे रक्तवाहिन्या होतात खराब; डायबिटीस, बीपीसह हार्ट अटॅकचा वाढतोय धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 10:08 AM2020-01-30T10:08:55+5:302020-01-30T10:25:44+5:30
दैनंदिन जीवन जगत असताना आहार घेताना आपण अनेक चुका करत असतो.
दैनंदिन जीवन जगत असताना आहार घेताना आपण अनेक चुका करत असतो. त्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो. आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या रक्तवाहिन्यांचे जाळे असते. रक्ततवाहिन्यांमधून ऑक्सीजनयुक्त रक्त शरीराला मिळत असतं. नंतर ते रक्त हृदयापर्यंत पोहोचवले जातं.
जसजसं वय वाढत जातं तसतसं शरीरातील रक्तवाहिन्या कठोर होत असतात. आपल्या काही चुकिच्या सवयींमुळे रक्तवाहिन्या खराब होत असतात. पण तुम्हाला माहित आहे का कोणत्या चुकिच्या सवयींमुळे रक्तवाहिन्या खराब होतात. आज आम्ही तुम्हाला आजारांपासून वाचण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. ( हे पण वाचा-थंडीच्या दिवसात 'या' भाज्या खाणं ठरेल फायदेशीर)
सिगारेट पिण्याची सवय
सिगारेटसारख्या मादक पदार्थांचे सेवन शरीरासाठी धोकादायक असतं. कारण स्मोकिंगमुळे कॅन्सरसारखे आजार होतात. रक्तवाहिन्या दुखायला लागतात. अनेक प्रकरच्या कार्डीओवॅस्क्युलर आजारांचा धोका असतो. कारण जर तुमच्या धमन्या तुम्हाला व्यवस्थीत हव्या असतील तर तुम्ही शक्य होईल तितक्या लवकर सिगारेटचे सेवन करणं सोडा. त्याप्रमाणेच तुम्ही दारूचे सेवन अधिक प्रमाणात करत असाल तर शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आणि रक्तदाबासंबंधी समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडून त्या खराब होत असतात. म्हणूनच तुम्ही मद्याचे सेवन जर करत असाल तर कमी प्रमाणात करा. ( हे पण वाचा--फक्त मास्कच नाही तर कोरोना व्हायरसपासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी)
कमी पोटॅशियमचा आहार घेणे
रक्तवाहिन्या स्वस्थ ठेवण्यासाठी पॉटॅशियम गरजेचे असते. शरीरात पोटॅशियमची कमी असेल तर रक्तवाहिन्या आकुंचन पावत असतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. म्हणून रक्तवाहिन्यांना चांगंल ठेवण्यासाठी पोटॅशियम मोठया प्रमाणात असेल अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. त्यासाठी सहज उपलब्ध होत असलेला आहार केळी, संत्री, पपई आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करा.
कमी फायबर असलेला आहार घ्या
जर तुमच्या आहारात फायबरर्सचे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला रक्तवाहिन्यांशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटाचे विकार होण्याचा धोका असतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले प्लाक साफ होतात. तसंच कोलेस्ट्रॉल कमी होतं. फळं, भाज्यांसारख्या कमी फायबरर्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.
साखर आणि मिठाचं जास्त सेवन
जर तुम्ही आहारात चहा कॉफी किंवा इतर माध्यमातून साखरेचे अतिप्रमाणात सेवन करत असाल तर तुम्हाला रक्तवाहिन्यांशी निगडीत आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाय ब्लडप्रेशर आणि डायबिटीस होण्याचा धोका असतो. म्हणून आहारात साखर आणि मिठाचा कमी प्रमाणात वापर करा. जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील.