रोजच्या डोकेदुखीमुळे होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, काय आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 10:18 AM2020-01-23T10:18:20+5:302020-01-23T10:22:51+5:30

आजकाल डोकेदुखीचा त्रास सगळ्यांनाच होत असतो. म्हणून लोकांनी या समस्येला आजार समजणं सोडून दिलं आहे.  

Daily headache may harmful for health know the symptoms | रोजच्या डोकेदुखीमुळे होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, काय आहेत लक्षणं

रोजच्या डोकेदुखीमुळे होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, काय आहेत लक्षणं

googlenewsNext

आजकाल डोकेदुखीचा त्रास सगळ्यांनाच होत असतो. म्हणून लोकांनी या समस्येला आजार समजणं सोडून दिलं आहे.  कारण अनेकजण डोकेदुखीच्या समस्येचा फारसं मनावर घेत नाहीत.  तेल किंवा पेन रिलिफ, बाम लावून तात्पूरतं बरं वाटल्यानंतर लोकं या समस्येकडे दुर्लक्ष करतात. पण दीर्घकाळ या समस्येकडे दुर्लक्ष करणं खूप महागात पडू शकतं. आज आम्ही तुम्हाला डोकोदुखीशी निगडीत काही गोष्टी सांगणार आहोत.  तासनतास आपण मोबाईल वापरत असल्यामुळे नकळतपणे याच गोष्टीचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. 

Related image
कॉप्यूटर विजन डोकेदुखी 

Related image

आजकाल सगळेच लोकं लॅपटॉपचा वापर करून तासनतास काम करत असतात. यामुळे कॉम्पूटर व्हीजन डोकेदुखी होण्याचा धोका जास्त असतो. जेव्हा तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा कोणत्याही स्क्रिनच्या समोर असता त्यावेळी डोळ्यांवर येत असलेल्या प्रकाशाचा परिणाम होऊन आजारांचा सामना करावा लागतो. या आजाराची काही लक्षणं आज आम्ही  तुम्हाला सांगणार आहोत. ( हे पण वाचा-अनेक प्रयत्न करूनही वजन कमी का होत नाही? जाणून घ्या एक्सपर्ट्स काय सांगतात....)Image result for headache

डोळ्यांना धुसर दिसणे,डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, मानेचे दुखणे उद्भवणे या लक्षणांपैकी कोणतीही लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला हा आजार असू शकतो. त्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन  उपचार करणं गरचेचं आहे. यासाठी काम करत असताना कमी प्रकाशात असलेल्या जागी बसणं टाळा. 

Image result for headache laptop screen
(image credit- pain doctor)

जाइंट सेल अर्टराइटिस  डोकेदुखी  

Related image(image credit-whobella.com)

जर डोकेदुखीसोबतच तुम्हाला जबड्यामध्ये सुद्धा दुखण्याचा त्रास होत असेल तर जाईंट सेल डोकेदुखीचा आजार असण्याची शक्यता असते. या आजाराची वजन वाढणे, डोळ्यांना धुसर दिसणे, ताप येणे, स्काल्पची त्वचा नेहमीपेक्षा जास्त  मऊ होणे ही मुळ लक्षणं जाणवतात. सर्वसाधारणपणे डोकेदुखी वयाच्या ५० वर्षानंतर अधिक होत  जाते. पण डोकेदुखी जर कमी वयात होत असेल आणि तुम्ही या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर डोळ्यांना  कमी दिसणाची समस्या उद्भवू शकते. ( हे पण वाचा-जीमला जायचा कंटाळा येत असेल तर 'या' १५ मिनिटांच्या एक्सरसाइजने वजन करू शकता कमी)

सर्वाइकोजेनिक डोकेदुखी 

Image result for headache laptop screen(image credit-therespace)

हा एक वेगळ्या प्रकारच्या डोकेदुखीचा आजार आहे.  यामुळे मानेच्या मागच्या भागात प्रचंड वेदना होतात. तसंच हा  आजार होण्याचा सगळ्यात जास्त धोका त्या लोकांना असतो. जे  लोक बसताना किंवा झोपताना व्यवस्थित स्थितीत नसातात. मानेच्या मागे आणि  मेंदूच्या मधल्या रेषेत एक पॉईँट असतो. त्याला C2 असं म्हणतात.  जेव्हा  हा आजार उद्भवतो त्यावेळी तुम्हाला विशिष्ट प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असते. मान आणि मेंदूच्या मधल्या भागात  वेदना होणे, मानेच्या मासपेशींना सुज येणे, मानेची हालचाल  सहज करता न येणे, छातीत दुखणे, खांदे दुखणे ही या आजाराची लक्षणं आहेत. 

Web Title: Daily headache may harmful for health know the symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.