... तर हार्ट अटॅकचा धोका १७ पटीनं वाढतो

By admin | Published: May 18, 2017 04:21 PM2017-05-18T16:21:12+5:302017-05-18T16:21:12+5:30

न्युमोनिया, अस्थमा असेल तर सावध, हे इन्फेक्शन घातक ठरू शकतं.

... the danger of heart attack increases by 17 times | ... तर हार्ट अटॅकचा धोका १७ पटीनं वाढतो

... तर हार्ट अटॅकचा धोका १७ पटीनं वाढतो

Next

- निशांत महाजन

अभिनेत्री रीमा लागू यांनी हार्टअ‍ॅटॅकने आज अचानक एक्झिट घेतली. आणि हार्ट अटॅकच्या भयानं पुन्हा एकवार उचल खाल्ली. मात्र सिडनी विद्यापीठानं प्रसिद्ध केलेला एक अभ्यास सांगतो की, फुफ्ुफुसाचे विकार, न्युमोनिया, अस्थमा या आजारातही काळजी घ्या कारण या आजारात श्वसनाचा त्रास, त्याची लक्षणं ही पहिल्या सात दिवसांत वाढत असले तरी एक महिन्यापर्यंत ते वाढत गेले तर सावध होवून त्वरित उपचार करा. हृदयाचीही काळजी घ्या.
श्वसनक्रियेतलं इन्फेक्शन हार्ट अटॅक चं ट्रिगर म्हणून काम करु शकतं, त्यातनू रक्ताच्या गुठळ्या होणं, रक्तवाहिन्या फुटणं, रक्ताच्या प्रवाहात बदल होणं अशी शक्यता असते असं आॅस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील प्रो. जेफरी टॉफलर यांनी आपल्या अभ्यासात म्हटलं आहे.
१३ प्रकारचे श्वसनाचे आजार, ताप, सर्दी यानेही हृदयाच्या कामात अडथळे येवू शकतात असं हा अभ्यास सांगतो. श्वसनाच्या इन्फेक्शकडे आणि आजाराकडे दुर्लक्ष करू नका असंही ते आवर्जुन सांगतात.

Web Title: ... the danger of heart attack increases by 17 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.