आयुर्वेद डॉक्टरांनुसार ओठांवर दिसतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष करणं पडेल महागात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 01:50 PM2024-09-13T13:50:56+5:302024-09-13T14:37:14+5:30
Diseases Symptoms On Lips : शरीरातील वेगवेगळे अवयव हे वेगवेगळ्या आजारांचे संकेत देत असतात. यातीलच एक अवयव म्हणजे आपले ओठ. ओठ बघूनही शरीरातील अनेक आजारांची माहिती घेता येते.
Diseases Symptoms On Lips : जगात वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. वेगवेगळ्या आजारांची लक्षणं वेगवेगळी असतात. काही आजारांची माहिती ही वेगवेगळ्या टेस्टच्या माध्यमातून मिळते तर काही आजार हे केवळ जीभ बघूनही समजून येतात. तसेच काही आजार हे केवळ नस बघून किंवा डोळे बघूनही जाणून घेता येतात.
शरीरातील वेगवेगळे अवयव हे वेगवेगळ्या आजारांचे संकेत देत असतात. यातीलच एक अवयव म्हणजे आपले ओठ. ओठ बघूनही शरीरातील अनेक आजारांची माहिती घेता येते. याबाबत आयुर्वेद डॉक्टर दीपक कुमार यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, ओठ कसे दिसत असले म्हणजे कोणत्या आजाराचा संकेत असू शकतो.
ओठांवर सूज
डॉक्टरांनी सांगितलं की, जर ओठांवर नेहमीच सूज राहत असेल, हा व्यक्तीच्या शरीरात काहीतरी एलर्जी असल्याचा संकेत आहे किंवा त्याला काही खाण्यामुळे रिअॅक्शन झालं असेल. पोटातही काही इन्फेक्शन असल्याने ओठांवर सूज राहते.
कोरडे ओठ
जर कुणाचे ओठ नेहमीच कोरडे राहत असतील तर याचा अर्थ होतो की, त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे किंवा त्यांना डिहायड्रेशन आहे. इतकंच नाही तर शरीरात पोषक तत्व कमी असल्यावरही ओठ कोरडे होतात. पोट जास्त खराब असल्यावरही असा संकेत दिसतो.
पिवळे ओठ
ओठ जर पिवळे दिसत असतील तर हा एनीमियाचा संकेत असू शकतो. शरीरात ऑक्सीजन कमी झालं तर लाल रक्तपेशी कमी होतात. अशात ही समस्या होते. ओठ पिवळे किंवा पांढरे दिसत असतील तर हा शरीरात आयर्न कमी असण्याचाही संकेत असू शकतो. ज्यामुळे थकवा आणि कमजोरी जाणवते.
निळे किंवा जांभळे ओठ
निळे ओठ सियानोसिसच संकेत असू शकतात. ही एक अशी स्थिती आहे ज्यात रक्तात ऑक्सीजन कमी होतं. तसेच ही समस्या श्वसन, हृदयरोग किंवा असंतुलित ब्लड सर्कुलेशनमुळेही होऊ शकते. अस्थमा, क्रोनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज (सीओपीडी) किंवा जन्मजात हृदयरोग अशा स्थितीत ओठ निळो किंवा जांभळ्या रंगाचे दिसतात.
लाल आणि सूजलेले ओठ
उन्हामुळे किंवा काही ब्युटी प्रोडक्ट्सच्या जळजळीमुळे ओठ लाल किंवा सूजलेले दिसू शकतात. चेइलिटिस ज्याला ओठांची सूज म्हणून ओळखलं जातं ही समस्या इन्फेक्शन, जळजळ किंवा व्हिटॅमिनची कमतरता यामुळेही होऊ शकते.