​प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणे धोक्याचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2016 05:16 PM2016-12-08T17:16:31+5:302016-12-08T17:16:31+5:30

सध्या प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिण्याचे फॅड वाढतच चालले आहे. लांब प्रवास करायचा असेल किंवा जास्त पाणी पिण्याच्या सवयीमुळे प्लास्टिकची बॉटल आपल्या बॅगेत नेहमी पाहावयास मिळते.

Dangers drinking water in a plastic bottle! | ​प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणे धोक्याचे!

​प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणे धोक्याचे!

googlenewsNext
ong>-Ravindra More

सध्या प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिण्याचे फॅड वाढतच चालले आहे. लांब प्रवास करायचा असेल किंवा जास्त पाणी पिण्याच्या सवयीमुळे प्लास्टिकची बॉटल आपल्या बॅगेत नेहमी पाहावयास मिळते. मात्र एका संशोधनानुसार प्लास्टिकच्या बॉटलचा प्रयोग करणे आरोग्यासाठी खूपच अपायकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. जर आपण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पित असाल तर आपणास कॅन्सर, मधुमेह, हृदय रोग हे आजार तसेच गर्भवती आई व तिच्या मुलाला धोका आहे. त्याशिवाय अजून धोकादायक आजार होऊ शकतात. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये कित्येक हानिकारक केमिकल्स असतात जे गरम झाल्यानंतर पाण्यात मिक्स होतात आणि तेच पाणी पिल्याने पाण्याबरोबर  पोटात गेलेल्या हानिकारक केमिकल्समुळे आपल्या शरीराला हानी पोहचते.

कॅन्सर 
कॅन्सर तज्ज्ञांच्या मते प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिल्याने कॅन्सर होऊ शकतो. प्लास्टिकची बॉटल जेव्हा उन्हामुळे किंवा जास्त तापमानामुळे गरम होते तेव्हा प्लास्टिकमधले हानिकारक केमिकल डायआॅक्सिन वितळून पाण्यात मिक्स होते. हे पाणी पिल्याने पाण्यात मिक्स झालेले डायआॅक्सिन केमिकल आपल्या शरीरात प्रवेश करते. त्यानंतर आपल्या शरीरातील पेशींवर डायआॅक्सिन खूपच वाईट परिणाम करते. त्यामुळे महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. 

मेंदूवर प्रतिकूल परिणाम
प्लास्टिकच्या बॉटलमध्ये प्रयोग करण्यात आलेल्या ‘बाइसफेनोल ए‘ मुळे मेंदूच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे मनुष्याची समजण्याची आणि स्मृतीची क्षमता कमी कमी होत जाते.  

अपचन व अ‍ॅसिडिटी 
प्लास्टिकची बॉटल बनविण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘बाइसफेनोल ए’ मुळे पोटावरदेखील प्रतिकूल परिणाम होतो. बीपीए नावाचे केमिकल जेव्हा पोटात पोहोचते तेव्हा पचनक्रियादेखील प्रभावित होते. यामुळे केलेले जेवण व्यवस्थित पचन नाही आणि पोटात गॅस निर्माण होऊन अ‍ॅसिडिटी होते. 

पोटाचे विकार
गेल्या काही महिन्यांपासून आपण एकाच बॉटलमध्ये पाणी पित असाल आणि ती बॉटल वेळोवेळी स्वच्छ धुतली नसेल तर त्यात बॅक्टेरिया तयार होतात. त्यामुळे  आपणास हमखास पोटाचे विकार होतील. आणि याचा विपरीत परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर जाणवू लागतो. 

मुलांमध्ये होऊ शकतो जन्म दोष
बॉटल बनविण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल हे भ्रूणामध्ये असामान्य गुणसूत्र निर्माण करु शकते, ज्यामुळे मुलांमध्ये जन्म दोष होऊ शकतो. तसेच गर्भावस्थेदरम्यान बॉटलमधील पाण्याचे नेहमी सेवन होत असेल तर जन्माला येणाºया बाळाला भविष्यात प्रोस्ट्रेट कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. 
 
गर्भपात होण्याचा धोका
प्लास्टिकच्या बॉटलमध्ये वापरण्यात आलेल्या केमिकलमुळे गर्भपाताचा धोका वाढतो. विशेषत: ज्या महिलांना गरोदर व्हायला काही अडचणी निर्माण झाल्या असतील किंवा ज्यांचे अगोदर पहिल्यांदा मिसकॅरेज झाले असेल त्या महिलांनी प्लास्टिकच्या बॉटलमधले जास्त पाणी प्यायला नकोय. अशा पाण्यामुळे पुरुषांमध्ये स्पर्म काऊंटदेखील कमी होते. 

कमी दर्जाच्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर टाळा
बहुतेक लोक पैसे वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला विक्री होत असलेल्या स्वस्त बॉटल खरेदी करतात. असे कदापी करु नये, कारण या बॉटल बनविताना रसायनांचा प्रयोग मोठ्या प्रमाणात केला जातो, गरम झाल्यानंतर ही रसायने पाण्यात मिक्स होतात, जी शरीरासाठी खूपच धोकेदायक ठरु शकतात.

Web Title: Dangers drinking water in a plastic bottle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.