दुधीच्या रसाच्या अतिसेवनाचे आहेत धोके, दुष्परिणाम वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 06:23 PM2021-06-29T18:23:18+5:302021-06-29T18:23:57+5:30
आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून दुधीचा रस पिण्यास सांगितले जाते. मात्र दुधीच्या रसाचे अतिसेवन केल्यास त्याचे तोटेही होऊ शकतात. जाणून घेऊया दुधीच्या रसाचे तोटे
सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, मूत्राशयाशी निगडीत अडचणी तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते. मात्र दुधीच्या रसाचे अतिसेवन केल्यास त्याचे तोटेही होऊ शकतात. जाणून घेऊया दुधीच्या रसाचे तोटे
साखरेचे प्रमाण कमी होणे
दुधीभोपळ्याच्या रसाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होऊ लागते. ज्या व्यक्तींच्या शरीरात साखरेचे प्रमाण कमी आहे त्यांनी दुधीचा रस पिऊच नये. असे केल्या चक्कर येते व काहीवेळा डोळ्यासमोर अंधारीही येऊ शकते.
सुज येणे
दुधीचा रस अति प्रमाणात प्यायल्याने हातापायांना सुज येते. तसेच शरीरावर लालसर चट्टेही उमटु शकतात. खाजही येऊ शकते.
ब्लड प्रेशर कमी होते
ज्या लोकांना जास्त ब्लड प्रेशर आहे त्यांनी दुधीचा रस पिणे उत्तम पण त्याचे अतिसेवन केल्यास पोटॅशिअमचा स्तर वाढतो व ब्लड प्रेशर अत्यंत कमी होते. त्यामुळे हायपोटेंशन सारखे विकार होण्याची शक्यता असते.
उलट्या, जुलाब होणे
दुधीचा रस तयार केल्यानंतर ते पिण्या आधी त्याची थोडी चव बघावी. आणि हा रस जर आपणास कडू लागल्यास त्याचे सेवन करू नये कारण यामुळे आपण उलटी, जुलाब व अस्वस्थ होऊ शकते.
कोणत्याही इतर रसासोबत घेऊ नका
दुधीचा रस पिताना हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कि, ह्या सोबत इतर कोणताही रस मिसळू नये. यामुळे शरीराला अपाय होतो.
एका दिवसात किती प्रमाणात दुधीचा रस प्यावा
एका दिवसात तुम्ही एक ग्लास दुधीचा रस पिऊ शकता. त्यापेक्षा जास्त रस पिऊ नका. काहीजण दुधीचा रस तयार केल्यानंतर काही वेळाने तो रस पितात. हे चूकीचे आहे. दुधीचा रस नेहमी फ्रेश प्यायला पाहिजे.
तसेच हा रस दिर्घकाळ बंद बाटलीत असेल आणि चवीला थोडा जरी कडू लागला तरी तो खराब आहे असे समजावे आणि तो अजिबात पिऊ नये. कारण त्यातून गंभीर इजा उद्भवण्याची शक्यता असते.