मानेवरचे काळे डाग दूर करण्यासाठी वापरा हे घरगुती उपाय, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 01:58 PM2022-09-02T13:58:34+5:302022-09-02T14:09:46+5:30
Dark neck : मान काळी होऊ नये यासाठी घरातून बाहेर निघताना चेहरा आणि मानेचा भाग पूर्णपणे कव्हर करा, जेणेकरून उन्ह लागणार नाही. त्यासोबतच मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही अॅलोवेरा जेलचा वापर करू शकता.
Home remedy for dark neck : उन्हामुळे आणि घामामुळे मानेवर काळे डाग पडतात, ज्यामुळे तेवढी त्वचा शरीरापासून पूर्णपणे वेगळी दिूसू लागते. उन्हाळ्यात ही समस्या फारच कॉमन आहे. पण यापासून वाचण्यासाठी अनेक उपाय केले जाऊ शकतात. मान काळी होऊ नये यासाठी घरातून बाहेर निघताना चेहरा आणि मानेचा भाग पूर्णपणे कव्हर करा, जेणेकरून उन्ह लागणार नाही. त्यासोबतच मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही अॅलोवेरा जेलचा वापर करू शकता.
- अॅलोवेरा जेल वेगवेगळ्या ब्युटी ट्रीटमेंटमध्ये कामी येतं. हे तुम्हाला कोणत्याही गार्डनमध्ये सहजपणे मिळू शकेल किंवा तुम्ही ते लावू शकता. अॅंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असणारं अॅलोवेरा मान काळी करणाऱ्या एंजाइमला लॉक करतं. याने हळूहळू मानेचा काळपटपणा कमी होतो. यासाठी रोज अॅलोवेरो जेल काढून 15 ते 20 मिनिटे मानेची मालिश करावी लागेल.
- अॅलोवेरा आणि काकडीचा वापर करूनही तुम्ही मानेचा काळपटपणा दूर करू शकता. अॅलोवेरा जेल आणि काकडीचा रस एकत्र करून लावल्यानेही मानेचा काळपटपणा दूर होतो. हे एकत्र लावल्याने त्या भागात चमक येते. सोबतच त्वचेचा कोरडेपणाही दूर होतो.
- अॅलोवेरा आणि मुलतानी मातीनेही तुम्ही काळी झालेली मान चमकदार बनवू शकता. यासाठी मुलतानी माती, अॅलोवेरा जेल आणि गुलाब जल मिश्रित करून एकत्र करा. हे मिश्रण मानेवर लावा. काही वेळाने कोमट पाण्याने मान धुवून घ्या. हे आठवड्यातून दोन वेळा करा.
- मानेवर काळेपणा उन्ह आणि घामासोबत तेथील सफाई व्यवस्थित न केल्यानेही येतो. त्यामुळे आंघोळ करताना मानेवरील मळ कापडाने घासून काढा. हे नियमित केल्यानेही मानेवर काळेपणा येणार नाही.
- एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस आणि तेवढेच मध मिक्स करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट मानेला लावा. या उपायाने मानेवरील डाग दूर होतील आणि त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही.
- ही खास पेस्ट तयार करण्यासाठी प्रत्येकी एक चमचा दूध आणि बेसन घ्या आणि त्यात चिमूटभर हळद मिसळा. ही पेस्ट मानेच्या काळ्या भागावर लावा आणि कोरडे होण्याची प्रतीक्षा करा. आता मानेला स्वच्छ पाण्याने धुवा. काही दिवस असे केल्यावर तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळण्यास सुरुवात होईल.
- एका भांड्यात एक वाटी लिंबाचा रस आणि बेसन एकत्र करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट मानेला लावा आणि काही वेळ कोरडे होण्याची प्रतीक्षा करा. यानंतर मानेला घासून पाण्याने स्वच्छ करा.
- प्रथम कच्ची पपई चांगली बारीक करून घ्या, त्यानंतर त्यात दही आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. यानंतर मान धुवा. मानेवरील काळे डाग कमी होऊ लागतात.