डार्विनच्या सिद्धांताला पुन्हा छेद; म्हणे धावपळ करणाऱ्यांपेक्षा आळशीच दीर्घायुषी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 08:56 PM2018-08-24T20:56:48+5:302018-08-24T21:02:56+5:30

जास्त उर्जा खर्च करणारे जीव अल्पायुषी

Darwin's theory is a hole again; Long-time lazy lazy people | डार्विनच्या सिद्धांताला पुन्हा छेद; म्हणे धावपळ करणाऱ्यांपेक्षा आळशीच दीर्घायुषी

डार्विनच्या सिद्धांताला पुन्हा छेद; म्हणे धावपळ करणाऱ्यांपेक्षा आळशीच दीर्घायुषी

लंडन : जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताला आणखी एका छेद देण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, हा प्रयत्न कोणी राजकीय व्यक्तीने केला नसून शास्त्रज्ञांनीच संशोधनाअंती केला आहे. काही समुद्री जीव त्यांच्या रोजच्या आयुष्यात जास्त उर्जा खर्च करतात, ते समांतर प्रजातीच्या कमी उर्जा खर्च करणाऱ्या जीवांपेक्षा कमी जगत असल्याचा शोध संशोधकांनी लावला आहे. म्हणजेच धावपळ करणाऱ्यांपेक्षा आळशीच दीर्घायुषी असतात असा याचा अर्थ होतो. संशोधकांनी 299 समुद्री जिवांचा अभ्यास केला. 


जादा उर्जा खर्च केल्याने या जिवांमध्ये चयापचय क्रिया वेगाने झाली. तर कमी उर्जा खर्च करणाऱ्या जिवांमध्ये चयापचय कमी होते. कन्सास विद्यापीठाचे बायोलॉजीचे प्राध्यापक ब्रूस लिबरमॅन यांनी सांगितले की, चयापचय क्रिया जेवढी हळू असेल तेवढे आयुष्य जास्त असते. कमी उर्जा खर्च करणाऱ्या जिवांना अन्नद्वारे कमी उर्जा लागते. यामुळे हे जीव कठीन वेळीही आरामात जगू शकतात. अशात जास्त उर्जा खर्च करणाऱ्या जिवांना जर तेवढी उर्जा मिळाली नाही तर ते कमजोर होऊन लवकर मरण्याची शक्यता असते. 


जगभरात अनेक प्रजाती नष्ट झाल्या किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. या संशोधनामुळे प्रजातींच्या नष्ट होण्याच्या कारणांचा शोध लागणार आहे. जगभरामध्ये अन्नसाखळी कमी झाल्याने अनेक जीव संपण्याच्या मार्गावर आहेत. यात जास्त उर्जा खर्च करणाऱ्या जिवांना मोठा धोका आहे. या संशोधनामुळे जमिनीवर राहणाऱ्या मानव आणि प्राण्यांबाबतही हेच सुत्र लागू होते का यावरही संशोधन करण्यास मदत मिळणार आहे. याचा अर्थ असा नाही की आळशी व्यक्ती जास्त स्वस्थ असतात, असेही या संशोधकांनी सांगितले. 

Web Title: Darwin's theory is a hole again; Long-time lazy lazy people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.