विवाहित पुरूषांसाठी अधिक फायदेशीर ठरतात खजूर, जाणून घ्या सेवनाची पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 10:12 AM2024-08-27T10:12:59+5:302024-08-27T10:13:39+5:30

Benefits of Dates For Men : जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने यातील पोषक तत्व शरीर चांगल्या पद्धतीने अब्जॉर्ब करतं. अशात आज आम्ही तुम्हाला खजूर खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

Dates are best for men's health and male fertility, sperm count and hemoglobin | विवाहित पुरूषांसाठी अधिक फायदेशीर ठरतात खजूर, जाणून घ्या सेवनाची पद्धत...

विवाहित पुरूषांसाठी अधिक फायदेशीर ठरतात खजूर, जाणून घ्या सेवनाची पद्धत...

Benefits of Dates For Men : खजुराचं सेवन हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. जर तुमच्या शरीरात रक्त कमी असेल किंवा काम करताना तुम्हाला थकवा येत असेल तर खजुरांचा डाएटमध्ये समावेश केला पाहिजे. यात आयर्न आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने यातील पोषक तत्व शरीर चांगल्या पद्धतीने अब्जॉर्ब करतं. अशात आज आम्ही तुम्हाला खजूर खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

रोज किती खजूर खावेत?

खजुरामध्ये नॅचरल शुगर असते, ज्याने शरीराला नुकसान पोहोचत नाही. अनेक लोकांना सतत गोड खाण्याची ईच्छा होत असते, अशात त्यांनी खजूर खायला हवेत. न्यूट्रीशनिस्ट निखिल वत्स यांच्यानुसार, रोज सकाळी नाश्त्यामध्ये कमीत कमी २ खजूर तुम्ही खाऊ शकता. याने पुरूष आणि महिला दोघांनाही एनर्जी मिळते.
रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे फायदे

१) शुगर लेव्हलवर नियंत्रण

जर काही गोड खाण्याचं मन झालं तर कॅंडी खाण्याऐवजी दोन खजूर खावे. गोड खाण्याची तलब भागवण्यासाठी खजूर खाणे सर्वात हेल्दी पद्धत आहे. पण यात कॅलरीजही अधिक प्रमाणात असल्याने जास्त खाणे नुकसानकारक ठरु शकतं. 

२) पचनक्रिया चांगली राहते

खजुरात फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे खजूर खाल्ल्याने पचनक्रिया नियंत्रणात राहते. यामुळे हृदयाचे आजारही होण्याची शक्यता कमी असते. 

३) अशक्तपणा होतो दूर

शरीरात आयर्न कमी झाल्यास अशक्तपणा येऊ शकतो. खजुरामध्ये आयर्न मोठ्या प्रणामात आढळतं. त्यामुळे तुम्हाला अशक्तपणाचा त्रास होणार नाही. 

४) हृदय चांगलं राहतं

१०० ग्रॅम खजुरात अधिक प्रमाणात पोटॅशिअम असतं. डब्ल्यूएचओच्या गाईडलाईननुसार, शरीराला पोटॅशिअम कमी मिळाल्याने ब्लड प्रेशर, हृदय विकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधीत आणखीही समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. 

५) हाडांना मिळते मजबूती

खजूर खाल्ल्याने कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन बी6 असतात. कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम दोन्हीमुळे हाडे मजबूज होतात.

६) त्वचा चमकते

खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेजी येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते.

पुरूषांसाठी फायदेशीर खजूर

आयुर्वेदात खजुरांचा वापर औषधी म्हणून केला जातो. खजूर आणि दुधाचं एकत्र सेवन केल्याने पुरूषांमध्ये फर्टिलिटी वाढते. रोज दोन किंवा तीन खजूर दुधात टाकून सेवन केल्याने ताकद आणि स्पर्म काउंटही वाढतो. तसेच यात आढळणाऱ्या मॅग्नेशिअमने शरीरातील शुगर कंट्रोल होते. ज्यामुळे तुमचा डायबिटीसपासूनही बचाव होतो.

Web Title: Dates are best for men's health and male fertility, sperm count and hemoglobin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.