Children's Day पालकांनो वेळीच लक्ष द्या, लहान मुलांमधील लठ्ठपणा आहे गंभीर समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 01:23 PM2022-11-14T13:23:56+5:302022-11-14T13:27:02+5:30
कितीतरी मुलांना कमी वयातच स्थूलतेचा सामना करावा लागतो. आपल्या मुलांचे वजन मर्यादेपेक्षा जास्त वाढत आहे याकडे पालकांचे लक्षच नसते.
Children's Dayलहान मुलांच्या पोषक आहाराची काळजी घेणे म्हणजे पालकांसाठी एक टास्कच असतो. मुलांच्या मागे लागून लागून त्यांना खायला घालायला लागते. आजकाल मोठ्यांचाच आहार पोषक नसतो, कित्येक पालकच जंक फुडचे सेवन करतात. त्यामुळे लहान मुलांनाही तशीच सवय लागली आहे. लहान मुलांना घरी बनवलेले अन्न नको असते तर बाहेरचे पदार्थ, पिझ्झा, बर्गर याच गोष्टी खायच्या असतात. त्यामुळे कितीतरी मुलांना कमी वयातच Obesity स्थूलतेचा सामना करावा लागतो. आपल्या मुलांचे वजन मर्यादेपेक्षा जास्त वाढत आहे याकडे पालकांचे लक्षच नसते. याचे गंभीर परिणाम मुलांना भोगावे लागतात. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
लहान मुलांमधील स्थूलतेचे आणखी एक कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. मुलांना मैदानी खेळ नको असतात तर घरात बसून मोबाईल, लॅपटॉप हेच बघायचे असते. त्यामुळे शारिरीक हालचालच कमी झाली आहे. सतत बसून खाल्ल्याने त्यांच्यातील चरबी वाढते, लठ्ठपणा येतो. भारतात १५ ते २० टक्के मुलांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे.
मुलांमधील स्थूलतेचे प्रमाण कमी करण्यासाठी मुलांचा आहार कसा असावा
अंडी
आहार तज्ञ नाश्त्यात अंडी खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिव बी, व्हिटॅमिन डी, ओमेगा ३, फॅटी अॅसिड आणि फॉलिक अॅसिड असे पोषक त्तव असतात. मुलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी हे तत्व आवश्यक आहेत.
दूध
दूधाचे नाव घेतले की काही मुलं नाक मुरडतात. दूध हे स्वत:मध्येच पोषक आहारासारखे आहे. यामध्ये सर्व न्युट्रिएंट्स चा समावेश आहे जे मुलांच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहेत. दुधातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन मुलांना तंदुरुस्त बनवते.
सुकामेवा
सुकामेवा प्रत्येक वयोगटासाठी उपयोगी आहे. मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी सुकामेवा केव्हाही फायदेशीर ठरतो. बदाम, अंजीर, अकरोड, काजू हे मुलांनी खाल्ले पाहिजे.
केळं
केळं हे अनेकांना आवडणारे आहे. लहान मुलांना रोज एक केळं खायला दिलं पाहिजे. केळ्यात व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. केळ्याने मुलांमध्ये ऊर्जा निर्माण होते.