Day Nap: दिवसा झोपण्याची समस्या चांगली की वाईट? जाणून घ्या असं केलं तर काय होतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 09:30 AM2023-03-17T09:30:22+5:302023-03-17T09:31:00+5:30

Day Nap Good Or Bad: अनेकदा असं होतं की, रात्री झोप  पूर्ण होत नाही आणि यामुळेच काही लोक दिवसाही झोप घेतात. चला जाणून घेऊ असं करणं योग्य आहे की अयोग्य...

Day Nap : Afternoon napping side effects of human body health problems | Day Nap: दिवसा झोपण्याची समस्या चांगली की वाईट? जाणून घ्या असं केलं तर काय होतं...

Day Nap: दिवसा झोपण्याची समस्या चांगली की वाईट? जाणून घ्या असं केलं तर काय होतं...

googlenewsNext

Day Nap Good Or Bad: आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगली झोप घेणं फार गरजेचं असतं. जास्तीत जास्त एक्सपर्ट्स हाच सल्ला देतात की, व्यक्तीने रात्री साधारण 8 तास झोप घ्यावी. जर झोप पूर्ण झाली नाही तर लठ्ठपणा वाढेल, इतकंच नाही तर शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात. अनेकदा असं होतं की, रात्री झोप  पूर्ण होत नाही आणि यामुळेच काही लोक दिवसाही झोप घेतात. चला जाणून घेऊ असं करणं योग्य आहे की अयोग्य...

दिवसा झोपणं चांगलं नाही

आयुर्वेदिक पद्धतीनुसार दिवसा झोपणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जात नाही. पण थकवा, सुस्ती आणि जास्त मेहनत केल्यानंतर आपण स्वत:ला रोखू शकत नाही. मग आरामात बेट, खुर्ची किंवा सोफ्यावर झोपतो. रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, दिवसा झोपल्याने बॉडी कफ वाढतो. 10 ते 15 मिनिटांची झोप घेणं चुकीचं नाही, पण दिवसा अनेक तासांची गाढ झोप घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही.

या लोकांसाठी दुपारी झोपणं वाईट

- जर तुम्हाला फिट रहायचं असेस, सोबतच मेंटल हेल्थही चांगली ठेवायची असेल तर दिवसा झोपू नका.

- जे लोक पोटावरील आणि कंबरेची चरबी कमी करण्याचा विचार करत आहेत त्यांनी केवळ रात्री झोपावं. 

- जे लोक जास्त तेलकट, तळलेले किंवा मैद्याचे  पदार्थ खातात त्यांनी दिवसा अजिबात झोपू नये.

- जे नेहमीच कफ वाढण्याच्या समस्येने वैतागलेले असतात, त्यांनीही दिवसा झोप घेऊ नये.

- डायबिटीस, हायपोथायरॉइड आणि पीसीओएस आजाराने पीडित लोकांनी दिवसा झोपू नये.

हे लोक दिवसा झोपू शकतात

- जे लोक प्रवासामुळे जास्त थकलेले असतात त्यांनी दिवसा थोडावेळ झोप घ्यावी.

- जे लोक फार सडपातळ किंवा कमजोर आहेत, त्यांनीही दिवसा झोपलं तर काही हरकत नाही.

- जर कोणत्या आजार किंवा सर्जरीनंतर डॉक्टर दिवसा आराम करण्यास सांगतात तेव्हाही दिवसा घ्यावी.

- चाइल्ड डिलिव्हरी करणाऱ्या महिलांनाही आरामाची गरज असते, त्यांनीही दिवसा झोप घ्यावी.

- 10 वर्षापेक्षा कमी आणि 70 वयापेक्षा जास्त असलेले लोकही दिवसा आराम करू शकतात.

Web Title: Day Nap : Afternoon napping side effects of human body health problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.