चपाती खाण्याची योग्य वेळ कोणती दिवस की रात्र? एका चुकीने वाढेल समस्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 02:59 PM2024-06-04T14:59:10+5:302024-06-04T15:30:49+5:30

अनेकदा असाही प्रश्न विचारला जातो की, रात्री चपाती खावी का किंवा किती खाव्यात? यावर एका डाएट एक्सपर्टने सांगितलं की, चपातीमध्ये जास्त कॅलरी आणि कार्ब्स असतात.

Day or night what is the right time to eat chapati? One mistake will increase the problem... | चपाती खाण्याची योग्य वेळ कोणती दिवस की रात्र? एका चुकीने वाढेल समस्या...

चपाती खाण्याची योग्य वेळ कोणती दिवस की रात्र? एका चुकीने वाढेल समस्या...

भारतीय जेवणात चपाती आणि भात या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेज. चपाती आणि भात हे दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जातात आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. पण अनेकदा असाही प्रश्न विचारला जातो की, रात्री चपाती खावी का किंवा किती खाव्यात? यावर एका डाएट एक्सपर्टने सांगितलं की, चपातीमध्ये जास्त कॅलरी आणि कार्ब्स असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही रात्री चपाती खाल तर ते जड होईल. चपाती जेव्हा शरीरात जाते तेव्हा त्यातून शुगर निघू लागते. ही शुगर रक्तात जाते. ज्यामुळे शुगर लेव्हलही वाढू शकते. म्हणजे काय तर रात्री उशीरा चपाती खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही.

रात्री चपाती खाणं किती योग्य?

सामान्यपणे एका छोट्या चपातीमध्ये ७१ कॅलरी असतात. जर तुम्ही रात्रीच्या जेवणात २ चपाती खाल तर १४० कॅलरी इनटेक होतात. चपातीसोबत तुम्ही भाजी आणि सलादही खाल. ज्यामुळे शरीरात कार्बोहायड्रेट वाढते आणि ज्यामुळे वेगाने तुमचं वजन वाढतं. जर तुम्ही रात्री जेवणानंतर वॉक करत नसाल तर तुमचं वजन वेगाने वाढेल. हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

शुगर वाढवू शकते चपाती

रात्री चपाती खाल्ल्याने शरीर शुगर लेव्हल वाढू शकते. यामुळे डायबिटीस आणि पीसीओडीची समस्या होऊ शकते. जेव्हा चपातीमुळे रक्तात शुगर वाढते तेव्हा इंन्सुलिन लेव्हलही प्रभावित होते आणि ही वाढलेली शुगर लेव्हल शरीरातील इतर अवयवांना प्रभावित करते. ज्यामुळे नुकसान होतं.

मेटाबॉलिज्म बिघडतं

चपातीमध्ये सिंपल कार्ब्स असतात जे तुमचं मेटाबॉलिज्म खराब करतात. यामुळे तुमची बॉवेल मुव्हमेंटही बरीच प्रभावित होते. रात्री चपातीऐवजी फायबरचं सेवन करावं. जेणेकरून आरोग्य चांगलं रहावं आणि पचनही वेळीच होतं.

रात्री किती चपात्या खाव्या?

जर तुम्ही रात्रीच्या वेळी चपाती खात असाल तर दोन पेक्षा जास्त खाऊ नये. इतकंच नाही तर जेवण झाल्यावर शतपावली नक्की करून या. याने चपाती पचनाला मदत होईल. चपाती एक सिंपल कार्ब आहे ज्याने तुमचं मेटाबॉलिज्म बिघडू शकतं. या कारणाने एक्सपर्ट्स रात्री चपातीऐवजी फायबर असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. जे शरीरासाठी फायदेशीर आणि पचनही लवकर होतात.

Web Title: Day or night what is the right time to eat chapati? One mistake will increase the problem...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.