किडनी खराब झाल्यावर लघवीतून येतो वेगळा वास, वेळीच सावध नाही झाले तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:22 AM2023-12-28T10:22:20+5:302023-12-28T10:22:53+5:30
Kidney Disease Urine Smell: किडनी आपल्या शरीराला फिल्टर करतात. यांद्वारे रक्तातील विषारी पदार्थ काढून रक्त साफ केलं जातं. जर काही कारणाने हे काम योग्यपणे होत नसेल तर लघवीचा रंग आणि गंध बदलतो.
Kidney Disease Urine Smell: वेगवेगळ्या कारणांनी किडनी हळूहळू खराब होतात आणि जर एकदा खराब झाल्या तर त्यांना ठीक करणं अशक्य होतं. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅंड प्रीवेंशननुसार, खराब न झालेल्या किडनी वाचवू शकता. यासाठी तुम्हाला लाइफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतात आणि खाण्या-पिण्यावर लक्ष द्यावं लागतं.
किडनी आपल्या शरीराला फिल्टर करतात. यांद्वारे रक्तातील विषारी पदार्थ काढून रक्त साफ केलं जातं. जर काही कारणाने हे काम योग्यपणे होत नसेल तर लघवीचा रंग आणि गंध बदलतो. त्यासोबतच उलटी, मळमळ, भूक न लागणे, पायांवर सूज, ड्राय स्किन, दम लागणे, झोप न येणे अशा समस्या होतात.
मृत माशांसारखा वास
अमोनियाचा गंध मृत माशांसारखा येतो. हा पदार्थ अनेक क्लीनिंग प्रॉडक्ट्समध्येही टाकला जातो आणि काही पदार्थ खाल्ल्यावरही हा शरीरात तयार होतो. तशी तर किडनी यांना लगेच बाहेर काढतात, पण जेव्हा डॅमेजमुळे आत वाढू लागतो तेव्हा लघवीतून वास येऊ लागतो. लघवीचा रंगही गर्द होतो.
डॉक्टरही काही करू शकणार नाही
सीडीसीनुसार, किडनी डॅमेज पुन्हा बरोबर करणं शक्य नाही. हे काम ना औषध करू शकेल ना डॉक्टर. पण ही समस्या रोखली जाऊ शकते आणि गंभीर होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो. किडनीच्या समस्येत तुम्हाला काही बदल करण्याची गरज असेल.
खाण्यात करा बदल
- सगळ्यात आधी मिठाचं सेवन कमी करा
- बेरीज, चेरीज, सफरदंच खावे
- फूल कोबी, कांदे, वांगी, शेवग्याच्या शेंगा खाव्या
- पांढरे ब्रेड, सॅंडविच, पास्ता खाऊ शकता
- भरपूर पाणी प्या, साखर नसलेला चहा घ्या
औषध आणि घाम गाळणं महत्वाचं
किडनी डिजीज वाढण्यापासून रोखण्यासाठी बॅलन्स डाएटसोबत दोन गोष्टींवर लक्ष द्यावं. औषध घेऊन डॅमेज वाढत नाही आणि शारीरिक हालचाल केल्याने किडनीवर काम करताना प्रेशर पडत नाही. त्यासोबतच स्मोकिंग, ड्रिंकिंग सोडा आणि बीपी-शुगर कंट्रोल करा.