कोरोना संकटातच आता मानवी मेंदू खाणाऱ्या जीवाणूचा कहर; CDC चा सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 02:46 PM2020-12-23T14:46:33+5:302020-12-23T15:44:33+5:30

Health News in Marathi : संशोधकांच्यामते कोरोनाच्या प्रसारात आता मानवी मेंदू खाणारा जीवघेणा अमीबा वेगाने पसरत आहे. या अमिबाचे नाव नेग्लरिया फाउलेरी आहे.

Deadly brain eating amoeba spread in us during coronavirus pandemic | कोरोना संकटातच आता मानवी मेंदू खाणाऱ्या जीवाणूचा कहर; CDC चा सतर्कतेचा इशारा

कोरोना संकटातच आता मानवी मेंदू खाणाऱ्या जीवाणूचा कहर; CDC चा सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

कोरोना विषाणूने आधीच जगभरात हाहाकार पसरवला आहे. अमेरिकेत संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे आणि आता अमेरिकेत एका नवीन समस्या निर्माण झाली आहे. अमेरिकेतील संशोधकांच्यामते कोरोनाच्या प्रसारात आता मानवी मेंदू खाणारा जीवघेणा अमीबा वेगाने पसरत आहे. या अमिबाचे नाव नेग्लरिया फाउलेरी आहे. जलवायू परिवर्तनमुळे या प्रकारचा अमीबा दक्षिण भागातून पूर्वेला आला आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशननं  दिलेल्या माहितीनुसार अमीबामुळे माणसांना होणारा धोका लक्षात घेता सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशनच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार नॉर्थ डकोटा, मिशिगन, विंसिकान्सिन आणि ओहायो अशा ठिकाणी अमीबाचे संक्रमण आधीपेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. दरवर्षी या अमीबामुळे आजारी होत असलेल्या लोकांची संख्या जवळपास सारखीच असते. 

एका अहवालानुसार 2009 पासून 2018 पर्यंत या अमीबाच्या संसर्गाची 34 प्रकरणे नोंदली गेली. त्याच वेळी, 1962 ते 2018 पर्यंत अमेरिकेत अशा प्रकारच्या संसर्ग झाल्याची 145 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. टेक्सासमध्ये काही महिन्यांपूर्वी मानवी मेंदू खात असलेल्या अमीबामुळे सहा वर्षांच्या मुलाचा देखील मृत्यू झाला होता. त्यानंतर लोकांना धोक्याची सुचना देण्यात आली होती.

आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून 'असा' करता येईल बचाव; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे प्रभावी उपाय

तसंच सरकारी पाणीपुरवठ्यातून  पुरवले जाणारे पाणी न वापरण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अ‍ॅबॉट यांनी या संदर्भात माहिती जाहीर केली होती की, या अमीबाची प्रतिकृती अधिक तीव्र होते, म्हणजेच ती आपल्या मॉडेलची वेगाने निर्मिती करते. अशा परिस्थितीत हे मानवांसाठी अत्यंत घातक ठरू शकते.

प्रतीकात्मक तस्वीर

कसं पसरतं जीवघेण्या अमीबाचं संक्रमण?

मेंदू खाणारा हा अमीबा पाण्यात आढळतो. हा अगदी सूक्ष्म जीव नाकातून मानवी मेंदूपर्यंत पोहोचून संसर्ग पसरवू शकतो. तज्ञांच्या मते, पाण्याचे स्रोत योग्य प्रकारे राखले नाहीत तर हा अमीबा संसर्ग पसरतो. अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राच्या मते, हा नवीन धोका लक्षात घेता लोकांना अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. दरम्यान, अशाप्रकारचा जीवाणू आढळल्यानंतर  दुषित पाण्याचा वापर न करण्याचा सुचना लेक जॅक्सन, फ्रीपोर्ट, अँगलटन, ब्राजोरिया, रिचवूड, आयस्टर क्रिक, क्लूट आणि रोजनबर्ग परिसरासाठी जारी करण्यात आली  होती.

CoronaVirus : ...म्हणून कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी महिला सक्षम; पण पुरूषांना धोका जास्त

टेक्सास प्रांतातील डाऊ केमिकल प्लँट आणि क्लेमेंस आणि वायने स्कॉट टेक्सास डिपार्टच्या क्रिमिनल जस्टिस येथे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. अमिबायुक्त पाण्याच्या वापरामुळे संकटाची शक्यता लेक जॅक्सन परिसरासाठी जारी करण्यात आली आहे. पाण्यामध्ये अमीबा सापडण्याचे प्रकार ८ सप्टेंबरपासून सुरू झाले होते. 

Web Title: Deadly brain eating amoeba spread in us during coronavirus pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.