भयावह! 'या' छोट्याशा कीटकामार्फत पसरतोय कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस; अवयव होतात निकामी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 04:34 PM2022-03-18T16:34:34+5:302022-03-18T16:38:35+5:30

Heartland Virus : कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत असतानाच जगात आणखी एका आजाराची नवी साथ पसरू लागली आहे.

deadly heartland virus spreads from ticks to human causing multiple organ failure with no treatment | भयावह! 'या' छोट्याशा कीटकामार्फत पसरतोय कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस; अवयव होतात निकामी

भयावह! 'या' छोट्याशा कीटकामार्फत पसरतोय कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस; अवयव होतात निकामी

Next

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. काही देशांमध्ये अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 46 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एक संकट आलं आहे. 

कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत असतानाच जगात आणखी एका आजाराची नवी साथ पसरू लागली आहे. एका छोट्याशा कीटकामार्फत हा व्हायरस वेगाने पसरतो आहे. धक्कादायक बाब म्हणजे याचा संसर्ग होताच मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं. म्हणजे मानवी शरारीतील बरेच अवयव निकामी होऊ लागतात. कीटकामार्फत पसरणाऱ्या व्हायरसची प्रकरणं अमेरिकेच्या जॉर्जियात समोर आली आहे. टिक्स या छोट्याशा किटकामार्फत माणसांमध्ये हा व्हायरस पसरत आहे. 

टिक्स म्हणजे ढेकूण. हा रक्त पिणारा छोटासा कीटक आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हार्टलँड असं या व्हायरसचं नाव आहे. हा व्हायरस किटकांआधी फक्त पांढऱ्या शेपटीच्या हरणात सापडला होता. 2009 साली मिसौरीमध्ये व्हायरसचं पहिलं प्रकरण समोर आलं. त्यानंतर माणसांमध्येही हा व्हायरस पसरू शकतो, याची पुष्टी 2013 ली झाली. आता दर 2000 टिक्सपैकी एकामध्ये हा व्हायरस असल्याचं दिसून आलं आहे.

हार्टलँड व्हायरसची काही लक्षणं देखीव तज्ज्ञांनी सांगितली आहेत. ताप, डोकेदुखी, सांध्यांमध्ये वेदना, भूक न लागणं ही हार्टलँड व्हायरसची लागण झाल्याची लक्षणं काय आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या व्हायरसवरही कोणतं औषध नाही किंवा बचावासाठी इंजेक्शन नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसप्रमाणेच आता या व्हासरसचीही लोकांमध्ये दहशत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: deadly heartland virus spreads from ticks to human causing multiple organ failure with no treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.