एक श्वास, जो क्षणाक्षणाला वाढवील तुमचं आयुष्य..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:57 PM2017-07-31T14:57:06+5:302017-07-31T14:58:21+5:30

खोटं नाही.. करून पाहा, अनुभवा आपल्यातला बदल..

Deep breathing.. gives long and healthy life | एक श्वास, जो क्षणाक्षणाला वाढवील तुमचं आयुष्य..

एक श्वास, जो क्षणाक्षणाला वाढवील तुमचं आयुष्य..

Next
ठळक मुद्देआत्मविश्वास वाढेलशरीरातील विषारी घटक बाहेर पडतीलव्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसेल

- मयूर पठाडे

अनेकदा आपल्याला होणाºया त्रासाचा उपाय आपल्याकडेच असतो. त्यासाठी फार कुठे जावं लागत नाही किंवा आटापिटाही करावा लागत नाही. पण आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचं मोल आपल्याला नसतं हेच खरं..
दीर्घ श्वास..
किती सोपी गोष्ट..
पण करतो का आपण ते? नाहीच. कारण त्याचं महत्त्वच आपल्याला माहीत नाही आणि पुन्हा कोणत्याही गोष्टीला लेबल लावण्यात आपण पटाईत असतो. ही गोष्ट ना, काय बोगस.. ती ना.. त्यात तर काही अर्थच नाही..
एकदा का असे लेबल कोणत्याही गोष्टीला चिकटवले गेले की मग ती करून पाहायची शक्यता तर मग आणखीच दूर जाते..
पण दीर्घ श्वासासारखी अगदी लहानशी गोष्ट.. ती तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते. आनंदी आणि हेल्दी जीवन जगण्याची ती एक अतिशय सोपी आणि पहिली पायरी आहे.
तुम्ही म्हणाल, दीर्घ श्वासानं असं होतं तरी काय?..
आता याबाबत कोणत्या तज्ञान काय म्हणून ठेवलंय, त्याला विज्ञानाचा काय पुरावा आहे, यातलं काहीदेखील मी तुम्हाला सांगणार नाही. फक्त तुम्ही करून बघा..
खाली दिलेले फायदे जर तुम्हाला स्वत:त दिसले नाहीत, पहिल्यापेक्षा तुमच्या आचार, विचारांत आणि आरोग्यांत बदल झाला नाही तर मग ही कृती करायची की नाही, याचा निर्णय घ्यायला, त्याला कुठलं लेबल लावायला तुम्ही मोकळे..
बघा करून..


दीर्घ श्वासाचे फायदे..
१- दीर्घ श्वासामुळे तुमच्या मनाला शांतता मिळते. तुम्हाला छळणाºया विचारांचा कलकलाट थांबतो आणि एक प्र्रकारची स्थिरचित्तता तुम्हाला लाभते.
२- तुमच्या शरीरातील विषारी घटक दीर्घ श्वासातून बाहेर पडतात. असंही आपल्या शरीरातील आपल्याला अपायकारक असलेले सुमारे ७० टक्के श्वासावाटे बाहेर पडतात. दीर्घ श्वासनामुळे ही प्रक्रिया सुदृढ आणि वेगवान होईल.
३- आपल्याला जर कुठल्या वेदना होत असतील तर त्या कमी होतील आणि होणाºया वेदनांचं प्रमाणही कमी असेल. दीर्घ श्वसनामुळे आपल्या शरीरात एन्डॉर्फिनचं प्रमाण वाढतं. हे एन्डॉर्फिन म्हणजे आपल्या शरीरातील नॅचरल पेनकिलर आहे. त्यामुळे साहजिकच आपल्या वेदना ते शमवतं.
४- दीर्घ श्वसनामुळे आपला मूड चांगला होतो. मूड स्विंगचे प्रकार होतात, तेही कमी होतात. तुम्हाला आनंदी करण्यासाठी याचा फार मोठा फायदा होतोे.
५- तुमच्या शरीराची ठेवणही यामुळे सुधारते. बºयाचदा आपण बसताना कुबड काढून बसतो, उभे राहतानाही खांदे पाडलेले असतात. दीर्घ श्वसनामुळे तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल.
६- तुमच्या हृदयाची क्षमताही दीर्घ श्वसनामुळे वाढते, जी तुम्हाला हृदयविकारासारख्या घातक आजारांपासून लांब ठेऊ शकते.
७- प्रत्येक क्षणाला आपण जो श्वास घेतो, तो प्रत्येक क्षण तुम्हाला दीर्घायू करू शकतो.

Web Title: Deep breathing.. gives long and healthy life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.